actress kangana ranaut
actress kangana ranaut  Team esakal
मनोरंजन

'माझ्याशिवाय ते काम चांगलं कोण करेल ?'; चर्चा 'Emergency'ची

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची क्वीन म्हणून प्रसिद्ध असणा-या कंगनाची चर्चा (bollywood actress kangana ranaut) दरदिवशी होते. ती आपल्या परखड स्वभावबद्दलही सर्वांना परिचित आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना चर्चेत आली आहे. तिचा आता एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. सध्या कंगनानं आपला मोर्चा राजकीय चित्रपटांकडे वळवल्याचे दिसून येते. नुकताच तिच्या जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित थलाईवी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. (actress kangana ranaut will direct film emergency says no one can direct it better than me)

कंगनानं आपण भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (first lady prime minister) यांच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटाची निर्मिती (indira gandhi) करणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी तिच्यावर अनेकांनी टीकाही केली होती. याचे कारण म्हणजे कंगना ज्या पक्षाच्या विचारांचे समर्थन करते त्यांची बाजू ती परखडपणे सोशल मीडियावर मांडते. हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे तिनं इंदिरांजींची भूमिका करणे हे काहींना खटकले होते.

आता कंगनानं तिच्या आगामी इमर्जन्सी (Emergency) नावाच्या चित्रपटाचे काही फोटो शेयर केले आहेत. त्यात मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करत आहेत. असे ते फोटो आहेत. यावेळी कंगनानं सांगितलं आहे, मी आता इमर्जन्सीची सुरुवात केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील कंगनाच करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तिनं आता माझ्याशिवाय आणखी कोण चांगल्या पद्धतीनं हे काम करणार असे सांगितले आहे.

कंगनानं कु अॅपवर या चित्रपटाविषयी सांगितले आहे. तिनं लिहिलं आहे, परत एकदा मला दिग्दर्शक होता आले याचा आनंद वाटतो आहे. मला पुन्हा एकदा माझ्या आवडीचे काम करायला मिळणार आहे. मी या चित्रपटासाठी उत्सुक आहे. इमर्जन्सी या चित्रपटाचे गेल्या वर्षभरापासून काम सुरु आहे. आता मला त्यात एक गोष्ट कळाली आहे, ती म्हणजे माझ्यापेक्षा या चित्रपटाचे काम आणखी कोण चांगल्या पद्धतीने करु शकणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT