Ketaki Chitale Esakal
मनोरंजन

Ketaki Chitale: कोरेगाव भीमावर केतकी म्हणाली, "मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना..."

सकाळ डिजिटल टीम

मराठी मनोरंजन विश्वामध्ये नेहमीच आपल्या परखड आणि आक्रमक स्वभावामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी केतकी चितळे ही नेहमीच तिच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तुरुंगातही जावे लागले होतं. मात्र तरीही ती आपलं मत मांडत असते.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी केतकीने सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. कोरेगाव-भीमा येथील ऐतिहासिक लढाईची आठवण म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या शौर्यदिनाच्या निमित्ताने तिने कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनाबद्दल काहीही पोस्ट न टाकल्यामूळे तिच्यावर टिका करण्यात आली, यावर केतकीने प्रतिक्रिया दिली. त्यामूळं ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तिच्या व्हिडिओला एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं होतं की ,“तमाम भारतीयांना भिमा कोरेगाव शौर्य दिनी शुभेच्छा द्याल असे वाटले होते. तुमच्याकडून आजचा दिवस दुर्लक्षित होणे अनपेक्षित आहे”.

या कमेंटवर केतकी भडकली आणि तिने त्या कमेंटवर खोचक प्रतिक्रिया दिली. ती कमेंट करत म्हणाली, “भिमा कोरेगाव म्हणजे तीच जागा जिथे ब्रिटिश सैन्यातील तुकडी पेशव्यांच्या विरोधात लढली?! ब्रिटिश सरकारच्या बाजूने मराठा सैन्याविरुद्ध लढणाऱ्या लोकांना मी शुभेच्छा देण्याची तुम्ही अपेक्षा ठेवता म्हणजे एक तर तुम्हाला मी राष्ट्रद्रोही (धर्मद्रोही) वाटते, किंवा तुम्हाला खरा इतिहास माहिती नाही. यातील नेमके काय?” केतकीच्या या प्रतिक्रियेमुळे तिच्यावर पुन्हा टिका होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT