Ketaki Chitale: "हिंदू आहेस ना", नेटकऱ्याने झापलं तर केतकीनं डायरेक्ट शिवीचं ... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ketaki Chitale

Ketaki Chitale: "हिंदू आहेस ना", नेटकऱ्याने झापलं तर केतकीनं डायरेक्ट शिवीचं ...

सोशल मीडियावर नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारी आणि नेहमीच ट्रोल होणाऱ्या आणि वादाच्या भोवऱ्यात अडकणारी केतकी चितळे हिची वेगळी ओळख देण्याची गरज नाही.

मराठी मनोरंजन विश्वामध्ये नेहमीच आपल्या परखड आणि आक्रमक स्वभावानं केतकीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसंच नेटकरी तिच्या पोस्टला टिका करणाऱ्यांना ती सडेतोड उत्तर देते.

हेही वाचा: Bigg Boss 16: एमसी स्टॅनसाठी काहीपण! बिग बॉसच्या घरातच लाइव कॉन्सर्ट दणक्यात..

काल अनेकांनी मावळत्या वर्षाला निरोप देत येणाऱ्या नव्या वर्षाचं जंगी सेलिब्रेशन केलं. केतकीनेही काल नव्या वर्षाचं स्वागत केलं. या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

हेही वाचा: Urfi Javed: "तुमच्या कामांकडे लक्ष द्या",चित्रा वाघ यांच्या पोस्टला उर्फीचा कडक रिप्लाय

या व्हिडीओत ती “माफ करा पण कधीही विसरू नका… हॅप्पी न्यू इयर” असं म्हणत दारूचा ग्लास हातात घेउन ती दिसली. हा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यासोबत “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।”,असं कॅप्शनमध्ये दिलं.

तिने ही पोस्ट टाकतात नेटकऱ्यांनी तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तर काहींनी तिच्यावर टिकाही केली. तर एका नेटकऱ्याने तिच्या या व्हिडीओद्वारे तिच्यावर निशाना साधत कमेंट करत लिहिलयं की, 'हिंदू आहेस ना, मग न्यू इअरला हिंदू देवाला हात जोडतात… तू दारू पिताना व्हिडीओ का काढतेस… खूप तरुण मुलं तुला फॉलो करत आहेत. काही चांगलं लोकांसमोर ठेव हीच अपेक्षा. हॅप्पी न्यू इयर.'

मग काय केतकी संतापली अन् तिने त्या नेटकऱ्याचा चांगलाच समाचार घेतला आणि नेटकऱ्याच्या या कमेंटवर उत्तर दिलं. एक शिवी देत तिने लिहिलं,'हे ग्रेगोरियन नववर्ष आहे. पंचांगानुसार नवीन वर्ष नाही.अर्थात तुमच्या पिढीला हा साधा फरक माहित असण्याची अपेक्षा ठेवणं हा माझा मूर्खपणा आहे.'