Manoj Muntashir On Gully Boy lyrics: Esakal
मनोरंजन

Manoj Muntashir: 'लंका जला देंगे' चा तुम्हाला त्रास मग 'घंटा लेकर जाएगा…' कसं चालतं? मनोज मुंतशिरचं दु:खचं वेगळं!

Manoj Muntashir On Gully Boy lyrics: मनोज मुंतशिरच्या विधानाची पुन्हा चर्चा!

Vaishali Patil

Manoj Muntashir On Gully Boy lyrics: प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक मनोज मुंतशिर हा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. मनोज मुंतशिर हा त्याच्या उत्कृष्ट लेखनासाठी ओळखला जायचा मात्र आदिपूरुष या चित्रपटामुळे त्याला टिकेचा सामना करावा लागला.

आदिपुरूष चित्रपटातील अनेक संवादांमुळे बराच वाद झाला. वाढता वाद पाहून लेखक आणि निर्मात्यांनी चित्रपटातील संवाद बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बऱ्याच महिन्यानंतर त्याने आपली चुक मान्य केली आणि दुसरी संधी मिळायला हवी असे सांगितले.

आता अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान मनोज मुंतशिरने जावेद अख्तर यांचे कौतुक केले. यावेळी त्याने सांगितले की आजपर्यंत तो रॅप गाणी स्वीकारू शकलेला नाही. यासोबत तो म्हणाला की कशाप्रकारे लोक त्याच्या संवादावर टीका करतात मात्र 'घंटा और नंगा' या आक्षेपार्ह शब्दांसारख्या रॅप गाण्यांवर काही टीका करत नाही त्यांना पुरस्कार मिळतात.

पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्याबद्दल बोलताना मनोज म्हणाला की, 'जर मी पुढची 20-25 वर्षे काम करत राहिलो तर कदाचित मी अशा टप्प्यावर येईल जिथे लोक जावेद अख्तर यांच्यासोबत माझे नाव सांगतील. मात्र सध्या मी स्वतःला त्या लायक समजत नाही. जर मी काही लोकांची नावे घेतली ज्यांचा मी मनापासून आदर करतो, त्यात जावेद साहब यांचे नाव आवर्जून असेल.'

मनोज मुंतशिरने चित्रपट पुरस्कारांवर देखील टीका केली आहे. अंकुर तिवारीच्या 'गली बॉय' मधील 'अपना टाइम आएगा' या गाण्यावर मनोजने टीका केली.

मनोजने लिहिलेल्या केसरीतील ‘तेरी मिट्टी’ या गाण्याला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला नव्हता तर त्यावेळी हा अवॉर्ड डिवाइन आणि अंकुर तिवारी यांनी लिहिलेल्या ‘अपना टाइम आएगा’ गाण्याला हा पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल बोलताना मनोज म्हणाला , 'त्या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांवर नजर टाकली तर त्यात एकापेक्षा एक उत्तम गाणी होती. मात्र त्यावेळी अवॉर्ड अशा गाण्याला मिळाला जो गीतकाराचे कुठलेच निकष पूर्ण करत नाही.'

रॅप गाण्यांबद्दल बोलताना मनोज मुनताशीर पुढे म्हणतो की, "आजपर्यंत मी एक श्रोता म्हणुन मी अजूनही रॅप गाणी स्विकारू शकलेलो नाही. मला रॅपबद्दल कोणतीही तक्रार नाही. मी गली बॉय मधली गाणी ऐकली आहेत, ती चांगली आहेत. पण लोकांना माझ्या 'लंका जला देंगे' सारख्या संवादांची अडचण आहे आणि ते 'नंगा ही तो आया था घंटा लेकर जायेगा' यात काहीच अडचण वाटत नाही. हे दोन्ही चुकीचे आहे असे मला वाटते. कलेत असंसदीय भाषा वापरण्याचा अधिकार कोणालाही नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

SCROLL FOR NEXT