actor sonu sood  team esakal
मनोरंजन

Father's Day: सोनू सूदने मुलाला भेट दिली महागडी कार? व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमुळे सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

स्वाती वेमूल

कोरोना महामारीच्या संकटकाळात आणि लॉकडाउनमध्ये गरजूंची मदत करणारा अभिनेता सोनू सूद Sonu Sood हा अनेकांसाठी जणू 'देवदूत'च ठरला. सध्या सोनू सूद सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे त्याची ही चर्चा होत असून 'फादर्स डे'निमित्त Father's Day हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोनूने त्याच्या मुलाला तीन कोटी रुपयांची कार भेट म्हणून दिल्याचं या व्हिडीओत दिसतंय. मुलगा इशांतला त्याने काळ्या रंगाची Mercedes-Maybach GLS600 ही कार दिल्याचं या व्हिडीओत दाखवलं गेलं आहे. (Ahead of Fathers Day Sonu Sood gifts his son a swanky car worth Rs 3 cr video viral)

या गाडीतून सोनू सूद त्याच्या मुलांना फिरण्यासाठी घेऊन गेला. मात्र या व्हिडीओबाबत अद्याप सोनूने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सोनू सूदकडे इतरही आलिशान गाड्यांचं कलेक्शन आहे. ऑडी Q7, मर्सिडीज बेंज एमएल क्लास, Porsche Panamera या गाड्यासुद्धा सोनू सूदकडे आहेत. सोनू लवकरच 'पृथ्वीराज', 'अल्लुडू अधर्स', 'आचार्य', 'तमिलारासन' या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

सोनू सूदची राजकारणात होणार का एंट्री?

सोनूच्या उदार स्वभावाचा परिचय त्याच्या चाहत्यांना आला आहे. कोरोनाच्या काळात त्यानं कोरोनाग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर मदत केली होती. त्यात त्यानं रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर, औषधे उपलब्ध करुन देणे यांसारखी महत्वाची कामं केली होती. त्यामुळे त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. त्याला त्याचे चाहते नेहमी एक प्रश्न विचारतात. तो म्हणजे तू राजकारणात कधी येणार? यावर सोनूनं गमतीशीर उत्तर दिलं आहे. "माझ्या फॅन्सला असे वाटते की मी लवकरच राजकारणात येणार आहे. मला असे वाटते राजकारण हे कमालीचे क्षेत्र आहे. त्यात खूप काही करण्यासारखेही आहे. मात्र मला त्यात यायला आणखी वेळ आहे. त्यामुळे सध्या जी चर्चा सुरु आहे त्याकडे फारसं लक्ष देऊ नये. दुसरं असं की, मला जेव्हा राजकारणात यायचं असेल तेव्हा मी ती गोष्ट सर्वांना ओरडून सांगितल्याशिवाय राहणार नाही," असं तो एका मुलाखतीत म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT