esakal | प्रेग्नंट नीनाला लग्नाची मागणी का घातली? सतीश कौशिक यांनी सांगितलं कारण
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेग्नंट नीनाला लग्नाची मागणी का घातली? सतीश कौशिक यांनी सांगितलं कारण

प्रेग्नंट नीनाला लग्नाची मागणी का घातली? सतीश कौशिक यांनी सांगितलं कारण

sakal_logo
By
शरयू काकडे

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री नीना गुप्ता Neena Gupta यांचं आत्मचरित्र 'सच कहूँ तो' सध्या फार चर्चेत आहे. नीना यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बरेच खुलासे या आत्मचरित्रात केले आहेत. मसाबा गुप्ताच्या जन्मावेळी नीना जेव्हा प्रेग्नंट होत्या तेव्हा त्यांना अभिनेते सतीश कौशिक Satish Kaushik यांनी लग्नासाठी प्रपोज केले होते. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान कौशिक यांनी, मित्र म्हणून (नीना) तिच्या प्रेमापोटी मी हे सार केल्याची कबुली दिली.

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी नुकतीचे एक आत्मचरित्र 'सच कहू तो...' प्रसिध्द केले. या आत्मचरित्रात नीना यांनी त्यांचे जवळचा मित्र सतिश कौशिक यांच्यासोबत घडलेला किस्सा शेअर केला आहे. 1980 च्या दशकात माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये असताना नीना प्रेग्नंट राहिल्या होत्या. नीना यांची मुलगी मसाबा गुप्ता असून त्यांनी एकटीनेच तिचा सांभाळल केला आहे. मसाबाच्या जन्माच्या आधी सतीश कौशिक यांनी नीना यांना लग्नासाठी प्रपोज केले होते. सतिश कौशिक यांनी एक मित्र या नात्याने हे सारे कसे केले याबाबत एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

हेही वाचा: 'ही' मालिका ठरली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

सतिश कौशिक यांनी सांगितले,''1975 पासून मी नीनाला ओळखत होतो आणि तेव्हापासून आमची चांगली मैत्री होती. त्याच मैत्रीच्या प्रेमापोटी त्यांनी नीना यांना लग्नासाठी प्रपोज केले होते. नीनाला एकटं वाटू नये असे मला वाटत होते''

''त्यावेळी एका मुलीने लग्न न करता मूल जन्म देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मला कौतुक वाटत होते. खरा मित्र म्हणून, मी नेहमी तिच्या सोबत होतो आणि तिला आत्मविश्वास देत होतो. या चरित्रातून तूम्ही जे काही वाचत आहात ते मी एक मित्र म्हणून तिच्यासाठी वाटणाऱ्या प्रेमापोटी केले आहे. मला ती एकटी पडू नये याची काळजी वाटत होती. शेवटी मित्र त्यासाठीच असातात. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे जेव्हा मी तिला लग्नासाठी विचारले तेव्हा तीच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. ही एक काळजी, सन्मान, आणि मित्र म्हणून तिला हव्या असेलल्या आधाराची गरज या समिश्र भावना होती.''असेही कौशिक यांनी सांगितले.

हेही वाचा: सतीश कौशिक यांनी गर्भवती नीना यांना लग्नासाठी केलं होतं प्रपोज

loading image