लिहिता वाचता येतं कुठं ? पण आहे दाक्षिणात्य सुपरस्टार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh babu

लिहिता वाचता येतं कुठं ? पण आहे दाक्षिणात्य सुपरस्टार

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध तेलगु सुपरस्टार महेश बाबू(mahesh babu) त्याच्या अभिनयाने आणि स्टाईलने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकतो. गेल्या 20 वर्षामध्ये महेश बाबूने 40 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. महेश बाबू हा सुपरस्टार कृष्णा यांचा मुलगा आहे. त्यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. महेश बाबूचा सारिलेरु नीकेवरु' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने 260 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. महेश बाबू तेलगु सिनेसृष्टीचा सुपरस्टार असला तरी त्याला तेलगू (telugu) लिहिता किंवा वाचता येत नाही.(mahesh babu can not read and write in telugu language)

महेश बाबू मूळचा चैन्नईचा आहे. त्याची तमिळ आणि इंग्रजी भाषा चांगली आहे. त्याच्या चित्रपटांच्या अनेक दिग्दर्शकांच्या मते, महेश बाबूचे पाठांतर अगदी चोख आहे. त्यांमुळे त्याला जरी तेलगू लिहिता किंवा वाचता येत नसले तरी तो चित्रपटांचे संवाद मात्र उत्तम पद्धतीने पाठ करतो.सुपरस्टार कार्ती आणि विजय हे महेश बाबूचे बालपणीचे मित्र आहेत. ही एक मजेशीर गोष्ट देखील आहे की महेश बाबू तेलगु सिनेसृष्टीचा सुपरस्टार असला तरी त्याला तेलगू लिहिता किंवा वाचता येत नाही. आतापर्यंत महेशचे १८ सिनेमे हिंदीमध्ये डब केले गेले आहेत. या सिनेमांमध्ये पोकिरी, अथाडु, डूकुडू, ओकडू, अशा लोकप्रिय सिनेमांचा समावेश आहे.

हेही वाचा: अंडरटेकर सिरियस झाला, बॉलीवूडच्या खिलाडीची तंतरली...

२००५ मध्ये त्याने अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. महेश बाबू आणि नम्रताला सितारा ही मुलगी आणि गौतम हा मुलगा आहे.

हेही वाचा: बजरंगीच्या ‘मुन्नी’ नं केली कंगनाची नक्कल, व्हिडिओ व्हायरल