Akshay Kumar
Akshay Kumar 
मनोरंजन

Akshay Kumar: कपाळावर भस्म अन् हातात त्रिशूळ;अक्षय कुमारचं पुन्हा 'तांडव'

सकाळ डिजिटल टीम

Akshay Kumar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा 'OMG 2' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये अक्षयनं भगवान शंकरची भूमिका साकारली होती. आता अक्षयचे शंभू (Shambhu) हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यामधील अक्षयच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून अक्षयनं सिंगिंग डेब्यू केला आहे.

अक्षयच्या लूकनं वेधलं लक्ष

अक्षयच्या नव्या गाण्याचे नाव 'शंभू' असं आहे. या गाण्यात अक्षय मगादेवाच्या भक्तीत तल्लिन झालेला दिसत आहे. अक्षय हा या गाण्यात कपाळावर भस्म, हातात त्रिशूळ आणि गळ्यात माळ अशा लूकमध्ये दिसत आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. 'शंभू' हे गाणं अक्षयनं गायलं आहे, त्यामुळे या गाण्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. सुधीर यदुवंशी, विक्रम माँट्रोज यांनी देखील हे गाणे गायले आहे.

अक्षयनं सोशल मीडियावर 'शंभू' या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, "आमचे दैवी ट्रीब्यूट, 'शंभू' गाणं रिलीज झालं आहे." अक्षयनं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अक्षयचा आगामी चित्रपट

अक्षय कुमार हा 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफ आणि अक्षय हे दोघे ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच टीझर रिलीज झाला होता. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT