sooryavanshi 
मनोरंजन

अक्षयचा 'सूर्यवंशी' या दिवशी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित, पण...

स्वाती वेमूल

बॉलिवूडचा 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षयचा बहुप्रतिक्षित व बहुचर्चित 'सुर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या गुड फ्रायडेला म्हणजेच २ एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट केवळ सिंगल स्क्रिन आणि नॉन नॅशनल मल्टिप्लेक्समध्येच प्रदर्शित होणार आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि रिलायन्स एंटरटेन्मेंटची पूर्ण टीम ही नॅशनल मल्टीप्लेक्स चेन पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस आणि कार्निव्हल यांच्यासोबत चर्चा करत आहेत. जवळपास गेल्या वर्षभरापासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. कारण निर्माते व दिग्दर्शकांना हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्हे तर मोठ्या पडद्यावर थिएटरमध्येच प्रदर्शित करायचा होता. 

आर्थिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न
अॅक्शन, रोमान्स, कॉमेडीने परिपूर्ण असा मसालापट देणारा दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीची ओळख आहे. त्याचसोबत हा त्याचा बिग बजेट चित्रपट असल्याने कोणत्याही व्यक्तीला त्याचं नुकसान सोसावं लागू नये, यासाठी टीम आटोकाट प्रयत्न करतेय. मात्र नॅशनल मल्टिप्लेक्ससोबत चर्चा अयशस्वी ठरल्याने त्यांना आता सिंगल स्क्रिन व नॉन नॅशनल मल्टिप्लेक्सवरच समाधान मानावं लागतंय. 

हेही वाचा : आमिरची लेक फिटनेस प्रशिक्षकाच्या प्रेमात; सोशल मीडियावर जाहीर केलं नातं
 
'नेटफ्लिक्स'सोबतही चर्चा सुरू
मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू असतानाच आता निर्माते नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मसोबतही चर्चा करत असल्याचं समजतंय. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच कतरिना कैफचीही मुख्य भूमिका आहे. अक्षय यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT