esakal | आमिरची लेक फिटनेस प्रशिक्षकाच्या प्रेमात; सोशल मीडियावर जाहीर केलं नातं
sakal

बोलून बातमी शोधा

aamir khan daughter ira khan

व्हॅलेंटाइन वीकमधील 'प्रॉमिस डे'चं निमित्त साधत इराने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.  

आमिरची लेक फिटनेस प्रशिक्षकाच्या प्रेमात; सोशल मीडियावर जाहीर केलं नातं

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानची मुलगी इरा खान सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण म्हणजे इराने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतेच पोस्ट केलेले फोटो. फिटनेस ट्रेनर नुपुर शिखरेसोबतचे फोटो पोस्ट करत इराने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं आहे. व्हॅलेंटाइन वीकमधील 'प्रॉमिस डे'चं निमित्त साधत इराने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.  

'तुझ्यासोबत आणि तुला वचनं देणं हे माझं सौभाग्य आहे', असं म्हणत इराने नुपुरसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. या कॅप्शनच्या हॅशटॅगमध्ये इराने #myvalentine असा उल्लेख केला आहे. तिच्या या फोटोंवर नेटकरी व सेलिब्रिटींकडून लाइक्स व शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 'दंगल' चित्रपटातील अभिनेत्री फातिमा सना शेख, करणवीर बोहरा यांसारख्या सेलिब्रिटींनी तिच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. 

हेही वाचा : २५० कोटींचा किंग खानचा नवा चित्रपट; सातव्यांदा करणार डबल रोल

लॉकडाउनदरम्यान इरा आणि नुपुर एकमेकांच्या प्रेमात पडले. नोव्हेंबरमध्ये महाबळेश्वर इथल्या आमिर खानच्या फार्महाऊसमध्ये दोघांनी सुट्ट्यांचा आनंद घेतला होता. इराने आई रिना दत्त यांच्याशी नुपुरची ओळख करून दिली होती. 

हेही वाचा : तोकडे कपडे घालून पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचं प्रकरण; प्रियांकाने आता मांडली तिची बाजू

इरा सोशल मीडियावर विविध मुद्द्यांवरून सतत व्यक्त होत असते. तिने याआधीही तिचं रिलेशनशिप नेटकऱ्यांकडून लपवलं नव्हतं. मिशाल कृपलानीसोबतचे तिने बरेच फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. मात्र ब्रेकअप झाल्यानंतर तिने हे सर्व फोटो डिलिट केले. नैराश्यासंदर्भातही ती व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी बोलताना दिसते. 

loading image