Ranbir Kapoor, Alia Bhatt Google
मनोरंजन

आलिया-रणबीर 'यंदा कर्तव्य नाही!';अभिनेत्रीनेच सांगितलं कारण

'ब्रम्हास्त्र' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान यांची रिअल लाईफ लव्हस्टोरी सुरू झाली.

प्रणाली मोरे

आलिया भट्ट (Alia Bhatt) रणबीर कपूर(Ranbir Kapoor) सोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातमीची सध्या जोरदार चर्चा होत होती. एका क्षणाला जाऊन तर आलियानं एका मुलाखतीत चक्क सांगितलं होतं की,''हो,आमचं लग्न केव्हाच झालंय''. पण नंतर तिनं ते मजेत सांगितल्याचं मान्यही केलं. पण आता जे काही तिनं लग्नाविषयीचे तिचे विचार मांडलेयत त्यावरनं मात्र सगळेच चक्रावून गेले आहेत. आलिया आणि रणबीर २०१७ पासून रीलेशनशीपमध्ये आहेत. अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' या सिनेमाच्या सेटवर त्यांची भेट झाली अन् तेव्हापासून प्रेमाचा सिलसिला सुरू झाला. सध्या ते लीव्ह इन मध्ये राहत आहेत. 'ब्रम्हास्त्र' सिनेमानं या दोघांची लव्हस्टोरी सुरू केली खरी, पण सिनेमाचे प्रदर्शन मात्र VFX तंत्रज्ञानाच्या सोपस्कारामुळे अद्याप लांबणीवर पडलं आहे.

आलियानं एका मुलाखतीत म्हटलं आहे,''दोन माणसं जेव्हा नात्यात असतात तेव्हा त्यांनी लग्न करायलाच पाहिजे असा साधारण विचार असतो. पण त्याहीपेक्षा ते दोघे लग्नासाठी खरंच तयार आहेत का हा विचार होणं देखील महत्त्वाचं आहे. आणि ती योग्य वेळ येईल तेव्हा ते होईलच. आता इंडस्ट्रीतले इतर लोकं लग्न करतायत म्हणून आमच्याही पाठी सर्व लागलेयत. मला लग्नाच्या अफवांमुळे त्रास वगैरे होत नाहीय,किंवा नुसते नात्यात राहून काय उपयोग,लग्न कधी करणार? या प्रश्नांनी मला फरक पडत नाही. मला वाटतं लग्नासारख्या नव्या नात्यासाठी तुमच्या मनात ती योग्य भावना हवी,ती निर्माण झाली की लग्न होणारंच. आणि हे मी माझ्या आणि रणबीरच्या बाबतीत सारखंच लागू होतं म्हणून बोलतेय''.

''आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहेच,तो माझ्या आयुष्यात आहे याचा मला आनंद आहे,मी त्याचा आदर करते,तो ज्या पद्धतीनं मला आधार देतो,प्रोत्साहन देतो तसं दुसरं कुणीच करू शकणार नाही. हो पण म्हणून उठा आणि लग्न करा असं नसतं. त्याची एक योग्य वेळ यावी लागते. आणि जेव्हा मी लग्न करेन तेव्हा संपूर्ण जगाला ते कळेल''. 'ब्रम्हास्त्र' सिनेमातून आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन,मौनी रॉय,नागार्जुन अक्किनेनी असे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमा येत्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या आलिया मात्र 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT