Amruta Fadnavis:  
मनोरंजन

Amruta Fadnavis: शब्द देवेंद्रजींचे सूर माझे संगीत अजय-अतुलचं! अमृताजींचे नवे गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीला

Amruta Fadnavis: संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण आहे. उद्या (सोमवार) २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदीरात श्रीरामच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Sandip Kapde

Amruta Fadnavis: संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण आहे. उद्या (सोमवार) २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदीरात श्रीरामच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक नेते, अभिनेते हे अयोध्येसाठी जाणार आहेत. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नुकतेच कैलाश खेर यांच्यासोबत गाण गायलं आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, अयोध्येत रामल्ला विराजमान होत आहेत ही सुखाची बाबा आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे स्वप्न पूर्ण होत आहे. योग्य निर्णय घेतल्यामुळे राम मंदिर झालं आहे. सगळ्या राम भक्तांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे.

पुण्यात भाजप महिला मोर्चातर्फे ‘वॉक फॉर नेशन’चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमृता फडणवीस उपस्थित होत्या.

दरम्यान अमृता फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाणं लिहलं असून  प्रसिद्ध संगितकार अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यात मी देखील गायलं आहे. आज पहिल्यांदाच मी हे सांगत असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या.

पुण्यातील महिलांना दिला सल्ला -

सर्व महिलांनी स्वत:कडे लक्ष द्यायल हवं. मी स्वत:कडे लक्ष देते त्यामुळे चमकते, तुम्हीही द्या अन चमका, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. पुण्यातील नमो वॉकथॉन स्पर्धेत अमृता फडणवीस बोलत होत्या. यावेळी त्यांनी गाणं देखील गायले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT