Nora Fatehi Deepfake Video : 'तुम्हाला खरं सांगते 'त्या' व्हिडिओमध्ये मी नाही'! नोराचाही 'डीपफेक' व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना, (Rashmika Mandanna) आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यानंतर नोराचाही एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे.
Nora Fatehi Deepfake video news
Nora Fatehi Deepfake video newsesakal

Nora Fatehi Deepfake video news : प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना, (Rashmika Mandanna) आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यानंतर नोराचाही एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. तो समोर आल्यानंतर सेलिब्रेटी नोराला मोठा धक्का बसला आहे.तिनं चाहत्यांना, (Nora Fatehi Deepfake Video) नेटकऱ्यांना आपण ती व्यक्ती नसून आपल्याऐवजी आणखी दुसरी कुणी तुमच्याशी संवाद साधत असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला (Nora Fatehi Latest Updates) होता. त्यानंतर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी डीपफेक व्हिडिओचा फटका बसल्याचे दिसून आले होते. त्यात आलिया भट्टच्याही व्हिडिओचा समावेश होता. आता नोराच्या व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या व्हिडिओमध्ये नोरा एका जाहिरातीद्वारे तिच्या चाहत्यांना आवाहन करते आहे. नोरानं हा व्हिडिओ डीपफेक असल्याचे म्हटले आहे.

नोरा त्या व्हिडिओतून चाहत्यांना एका शूजसंबंधीचे प्रमोशन करताना (nora viral latest news) दिसत आहेत. तिनं हे सगळं खूपच धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. ती मी नव्हेच! असे नोराचे म्हणणे आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, ज्यानं रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ तयार केला होता त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

दिल्ली पोलिसांनी एका बी टेक पदवीधराला आंध्रप्रदेशातून अटक केली असून त्याचे कनेक्शन रश्मिकाच्या डीपफेक व्हिडिओशी असल्याचा पोलिसांना संशय आहे. रश्मिकाच्या त्या डीपफेक व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडाली होती.

काही दिवसांपूर्वी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (Union Minister of State for Information Technology Rajeev Chandrasekhar) यांनी डीपफेक बाबत कडक आणि कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. याशिवाय सरकारकडून या प्रकाराबाबत धोरणात्मक निर्णय़ घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. देशातील सेलिब्रेटी असो किंवा सर्वसामान्य व्यक्ती यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं डीपफेक हे गंभीर प्रकरण आहे.

Nora Fatehi Deepfake video news
Rashmika Mandanna Deepfake Video: रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ बनवणारा अखेर सापडलाच! मुख्य आरोपीला झाली अटक

चंद्रशेखर यांनी असंही म्हटलं होतं की, डीपफेक व्हिडिओ तयार करण्यासाठी एआयची मदत घेतली जात आहे. त्यामुळे एआयकडून भविष्यात जर अशा प्रकारचा धोका होणार असेल त्याबाबत गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. ते तंत्रज्ञान हे कोट्यवधी भारतीय लोकांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. केंद्राकडून याबाबत तातडीनं मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com