amruta khanvilkar,ved movie, ved , riteish deshmukh, genelia deshmukh SAKAL
मनोरंजन

Ved Movie: रितेश - जिनिलियाच्या 'वेड' मुळे अमृता खानविलकरला बसलाय हा फटका, काय घडलं नक्की?

वेड एकीकडे सुपरहिट झाला पण त्याचा फटका मात्र अमृता खानविलकरला बसला

Devendra Jadhav

Ved Movie: रितेश देशमुख - जिनिलिया देशमुख या दोघांचा वेड सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज झाला. वेडने आतापर्यंत ७० पेक्षा जास्त कोटींची कमाई केली. वेड लवकरच ८० कोटी कमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेड एकीकडे सुपरहिट झाला पण त्याचा फटका मात्र अमृता खानविलकरला बसला. नक्की काय घडलं? अमृता खानविलकर आणि वेडचा संबंध काय? बघूया

३० डिसेंबरला वेड सिनेमा रिलीज झाला. वेड सोबत अमृता खानविकरचा ऑटोग्राफ सिनेमा रिलीज होणार होता. अशाप्रकारे ३० डिसेंबरला वेड आणि ऑटोग्राफ या दोन्ही सिनेमांची टक्कर होणार होती. पण वेड समोर कोणतीही टक्कर होऊ नये म्हणून अमृता खानविलकरच्या ऑटोग्राफ सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

वेड रिलीज व्हायच्या आधी रोहित शेट्टीचा सर्कस रिलीज झालेला. पण सर्कस फ्लॉप ठरला. ऑटोग्राफची रिलीज डेट सुद्धा पुढे गेली. म्हणून वेड समोर कोणताही सिनेमा नव्हता. त्याचा फायदा वेड ला झाला आणि वेड सुपरहिट झाला.

दुसरीकडे वेड आधीच अमृता खानविलकरच्या ऑटोग्राफ सिनेमाची घोषणा झाली होती. सतीश राजवाडे सिनेमाचे दिग्दर्शक होते. तर अमृता सोबत अंकुश चौधरी आणि उर्मिला कोठारे असे लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकेत होते. सिनेमा रोमँटिक वळणाचा होता. सिनेमातलं गाणं सुद्धा रिलीज होणार होतं. पण वेड समोर टक्कर नको म्हणून ऑटोग्राफ ची ३० डिसेंबर हि रिलीज डेट रद्द केली गेली.

आता अमृता - अंकुशच्या ऑटोग्राफ सिनेमाची नवीन रिलीज डेट अजून समोर आली नाहीये. तरीही ऑटोग्राफ सिनेमाची पुन्हा एकदा घोषणा लवकरच होईल याची चाहत्यांना आशा आहे.

३० डिसेंबरला बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' रिलीज झाला. रितेशचा दिग्दर्शक म्हणून तर जिनिलियाचा अभिनेत्री म्हणून मराठीतला हा पहिलाच सिनेमा आहे. रितेश व जिनिलीयाच्या 'वेड' बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.

वेडने रेकॉर्डतोड कमाई करत सर्वांच्या भूवया उंचावल्या. लोकांकडून मिळणारा प्रतिसाद बघता काही दिवसानानंतर वेड सिनेमात काही नवीन सीन्स आणि 'वेड तुझा' या गाण्याचं नवीन व्हर्जन समाविष्ट करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT