
Pathaan: तो कायम राजाच असेल.. जगप्रसिद्ध लेखक पाऊलो कोहेलो शाहरुखचा 'पठाण' पाहून भारावले
Paulo Coelho on Pathaan Movie: शाहरुख खानचा पठाण रिलीज होऊन आता आठवडा झाला. गेल्या आठवड्याभरात शाहरुखच्या पठाणने जगभरात ५०० कोटींच्या वर कमाई केली. जगभरातले फॅन्स पठाणचं कौतुक करत आहेत. अशातच द अल्केमिस्ट, ब्रिडा अशा सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक पाऊलो कोहेलो यांनी शाहरुखच्या पठाणचं कौतुक केलं आहे. पाऊलो यांनी ट्विटर वर ट्विट केलं आहे.
पठाण नंतर शाहरुखचे फॅन्स त्याला भेटायला जन्नत च्या बाहेर आले होते. त्यावेळी शाहरुखने सुद्धा फॅन्सची भेट घेऊन त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. हाच व्हिडिओ शेयर करत पाऊलो म्हणतात, "किंग, लेजेंड आणि मित्र.. आणि या सगळ्याच्या पलीकडे एक उत्कृष्ट अभिनेता. जी लोकं त्याला पश्चिमेला ओळखत नाही त्यांना मी सुचवतो माय नेम इस खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट" अशी पोस्ट त्यांनी केली आहे. एकूणच जगभरात पठाणची हवा आहे.
25 जानेवारीला रिलिज झालेल्या पठाण या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवलं. सात दिवस पुर्ण झाले असूनही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.पठाणची क्रेझ फक्त भारतातच नाही तर परदेशातही पाहायला मिळत आहे.
पठाण हा 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. फिल्म ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांच्या मते, पठाणने एका आठवड्यात जगभरातील बॉक्स ऑफिसवर 640 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. हा चित्रपट जगभरात 8 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे, जो एक अनोखा विक्रम आहे.
भारतभरातील संपूर्ण थेटरमधलं वातावरण पठाणमय झालं आहे. पठाण निमित्ताने शाहरुख खानने 4 वर्षांनंतर हिंदी इंडस्ट्रीत कमबॅक केलंय. शाहरुखच्या पठाण सिनेमाचं अनेक कलाकार तोंड भरून कौतुक करत आहेत.
अलीकडे शाहरुख लाल सिंग चड्ढा , रॉकेटरी, ब्रम्हास्त्र अशा सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला.पण प्रमुख भूमिका म्हणून ४ वर्षांनी शाहरुखने पठाण च्या माध्यमातून दमदार कमबॅक केलंय. ऍक्शन-थ्रिलर 'पठाण' २५ जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.