
Ved Movie Box Office Collection: वाह रे विक्रम.. वेड ची ८० कोटी कडे रेकॉर्डतोड घोडदौड...
Ved Movie Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज झाला. रितेशचा दिग्दर्शक म्हणून तर जिनिलियाचा अभिनेत्री म्हणून मराठीतला हा पहिलाच सिनेमा आहे. रितेश व जिनिलीयाच्या 'वेड' बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. वेडने रेकॉर्डतोड कमाई करत सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
वेड आता थेट ८० कोटींच्या घरात जाणार आहे. वेडने आजवर ७० कोटींची कमाई केली आहे. वेडने जगभरातून ७० कोटींची विक्रमी कमाई केली आहे. त्यामुळे रितेशचा वेड सिनेमा मालामाल झाला असून तो लवकरच १०० कोटींच्या क्लब मध्ये जाईल अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेड ची आता पाचव्या आठवड्यात दमदार एंट्री झाली आहे. वेडने पाचव्या आठवड्यातल्या शुक्रवारी तब्बल ५७ कोटी रुपये कमावले आहेत.
वेड ने आतापर्यंत जगभरातून ७०. ९० कोटीची कमाई केली आहे. तर भारतात वेडने ५८. ११ कोटी इतकी भरघोस कमाई केली आहे. रितेशने यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत "तुमच्या प्रेमाचे आभार, मी तुमचा कायम ऋणी आहे" अशी पोस्ट शेयर केली आहे.
पहिल्या दिवसापासूनच 'वेड'नं बॉक्स ऑफिसवर त्याची घट्ट पकड निर्माण केली होती. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ४० कोटींचा टप्पा पार केला आणि तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने तब्बल ५० कोटींची कमाई केली.
'वेड' हा सिनेमा नागा चैतन्य आणि सामंथा यांच्या 'मजिली' या तेलुगू सिनेमावर आधारित आहे. वेड जरी रिमेक नसला तरीही रितेश आणि जिनिलियाचा जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. वेड सिनेमात रितेश - जिनिलिया सोबत वेड मध्ये जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुपरस्टार सलमान खानचं विशेष गाणं सिनेमात भाव खाऊन जातं.