Animal full HD movie leaked online: Esakal
मनोरंजन

Animal: रिलिज होताच 'अ‍ॅनिमल'ला पायरसीचा फटका! 'या' वेबसाईटवर HD प्रिंटमध्ये चित्रपट झाला लीक

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेचच ऑनलाइन लीक झाला आहे.

Vaishali Patil

Animal full HD movie leaked online: सध्या मनोरंजन विश्वात दोन सिनेमांची सर्वात जास्त चर्चा आहे. त्यात एक म्हणजे अॅनिमल आणि दुसरा म्हणजे सॅम बहादूर. एक रणबीर कपुरचा आणि दुसरा विकी कौशलचा. त्यातच रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा या वर्षातील मोस्ट अवेटेड सिनेमा आहे.

या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून खुपच चर्चा होती. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या दिवशी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती.

एकीकडे या चित्रपटाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी चर्चा होती मात्र आता निर्मात्यांसाठी एक मोठा धक्का देणार बातमी समोर आली आहे. 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेचच ऑनलाइन लीक झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, MovieRules, FilmyZilla, TamilRockers, Telegram आणि 123Movies या सारख्या अनेक साइट्सवर Animal हा चित्रपट उपलब्ध आहे. लोक या साईट वरुन चित्रपट HD प्रिंटमध्ये डाउनलोड करत आहेत.

त्यामुळे आता या सिनेमाचे महागडे तिकीट खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या हा चित्रपट प्रेक्षक पाहू शकणार आहे. त्यामुळे याचा परिणाम तिकीट खरेदीवर होईल अशी चर्चा आहे.

'अ‍ॅनिमल' चित्रपटातून पहिल्यांदाच रणबीर कपुर आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओल, तृप्ती डिमरी चित्रपटात महत्वाच्या भुमिकेत आहे.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला 'अ‍ॅनिमल' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT