Kangana Ranaut: "महिलेला पुरुषाची गरज आहेच पण..." नीना गुप्ता यांच्या 'फेमिनिझम' वक्तव्यावर कंगना बोललीच!

Kangana Ranaut On Neena Gupta feminism statement:
Kangana Ranaut On Neena Gupta feminism statement:Esakal

Kangana Ranaut On Neena Gupta feminism statement: बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांना आपल्या बेधडक अंदाज आणि वक्तव्यासाठी ओळखले जाते.

त्यांनी फेमिनिझम' बाबत केलेले एक वक्तव्य सध्या खुप चर्चेत आले आहे. त्यांनी नुकतच फेमिनिझमवर आपले मत व्यक्त करताना सांगितले होते की, स्त्री आणि पुरुष कधीही समान असू शकत नाहीत. त्यामुळेहा मुद्दा निरुपयोगी आहे.

Kangana Ranaut On Neena Gupta feminism statement:
Malvika Raj Wedding: 'कभी खुशी कभी गम' फेम मालविका अडकली लग्न बंधनात! कोण आहे तिच्या स्वप्नांचा राजकुमार?

सध्या त्यांच्या या विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. या विधानांमुळे लोकांनी त्यांना प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर आता नीना यांच्या या वक्तव्यावर बॉलिवूडची पंगा क्विन कंगना राणौतने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना नेहमीच अनेक विषयांवर आपले मत व्यक्त करत असते. आता नीना यांच्या या स्त्रीवादाच्या विधानाचे समर्थन करत कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेयर केली आहे.

कंगना तिच्या इन्स्टा स्टोरीत लिहिते, 'नीना जी बोलल्या त्यावर इतकी तीव्र प्रतिक्रिया का आली हे मला समजले नाही. स्त्री आणि पुरुष कधीही समान असू शकत नाहीत. ते एका गोष्टीत एकमेकांपासून वेगळे आहेत. ते समान आहेत?

Kangana Ranaut On Neena Gupta feminism statement:
Animal Twitter Review: 'आरारारा खतरनाक'; काय रणबीर अन् काय बॉबी! नेटकऱ्यांना भलताच आवडला 'अ‍ॅनिमल'.. कसा आहे सिनेमा?

यात कंगना पुढे लिहिते की, 'स्त्री आणि पुरुष यांना बाजूला ठेवून विचार केला तरी आपल्यापैकी कोणीही समान नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण विकासाच्या वेगळ्या टप्यात आहे. तर आपल्याकडे देव, गुरु, आणि बॉस आहे. काहींना अधिक अनुभव आहे किंवा काही प्रत्यक्षात अधिक विकसित आहेत, परंतु आम्ही कोणत्याही स्तरावर समान नाही.'

यात कंगना पुढे लिहिते की , 'आम्हाला पुरुषाची गरज आहे का? अर्थातच आहे. जशी पुरुषाला स्त्रीची गरज असते. माझ्या आईचे आयुष्य अडचणींनी भरले असते जर तिला एकटेच आयुष्य जगावे लागले असते. त्याचप्रमाणे माझे वडील देखील माझ्या आईशिवाय त्यांचे जीवन जगू शकत नाहीत. यात कसली लाज आहे समजत नाही!!

Kangana Ranaut On Neena Gupta feminism statement:
Sam Bahadur Twitter Review: विकीचा 'सॅम बहादूर' पाहिल्यानंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय? थिएटरमध्ये जाण्यापूर्वी एकदा वाचाच!

'पुरुषांसाठी हे खुपच चांगले आहे का? हे सर्वांना माहित आहे की ते महिन्याचे सातही दिवस रक्तस्त्राव करत नाहीत आणि त्यांच्यात दैवी स्त्री शक्तीचा प्रवाह वाहत नाही महिलांपेक्षा मुलं अधिक सुरक्षित आहेत.

मुलींसाठी, विशेषतः तरुण मुलींसाठी हे सोपे नाही.' आता कंगनाच्या या वक्तव्यांची सोशल मिडियावर खुप चर्चा होत आहे, ही पोस्ट व्हायरल होत असून नेटकरी तिच्यावर टीक करत आहेत तर काही लोक तिला पाठिंबा देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com