Ankita Lokhande 
मनोरंजन

पार्टी करण्यासाठी, पैसे उधळण्यासाठी लग्न केलं- अंकिता लोखंडे

अंकिताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रियकर विकी जैन याच्याशी लग्नगाठ बांधली.

स्वाती वेमूल

अभिनेत्री अंकिता लोखंडेची (Ankita Lokhande) 'पवित्र रिश्ता' ही मालिका लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच मालिकेतून अंकिता घराघरात पोहोचली. तिने साकारलेल्या अर्चनाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) तिने पहिल्या मालिकेत काम केलं होतं. आता या नव्या मालिकेत सुशांतची जागा अभिनेता शाहीर शेखने (Shaheer Shaikh) घेतली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता या मालिकेविषयी आणि तिच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

आधीच्या मालिकेतील अर्चना आणि आताची अर्चना यांमधील फरकाबद्दल सांगताना ती म्हणाली, "मालिकेच्या या दुसऱ्या सिझनमध्ये काय नवीन असेल? तर अर्चना. तुम्ही तिला कॉलेजमध्ये जाताना पाहणार, ऑफिसला जाताना पाहणार. या अर्चनामध्ये बरेच बदल झाले असून ते प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. ती आता त्यागाची देवी नाही राहिली. आता ती स्वत:साठी जगणार आहे. तिच्या या भूमिकेवरसुद्धा प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतील, अशी मला खात्री आहे."

अंकिताने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रियकर विकी जैन याच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्नाविषयी ती पुढे म्हणाली, "लग्नानंतर माझ्यासाठी काहीच बदललं नाही. विकी आणि माझ्यात खूप चांगली मैत्री आहे. त्याने माझी खूप साथ दिली. पार्टी करण्यासाठी मी लग्न केलं. आम्ही सलग तीन दिवस पार्टीच करत होतो. आम्हाला फक्त पैसे उधळायचे होते."

अंकिता आणि विकी यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs PAK : वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

Talathi Bharti 2026: MPSC कडून तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! जाणून घ्या पेपर पॅटर्न, विषय आणि गुणपद्धती

रामाच्या भूमिकेसाठी रणबीरने केला योग, ध्यान आणि धर्मग्रंथाचा अभ्यास; रामायणासाठी जाणून घेतलं प्रभू श्रीरामांचं तत्वज्ञान

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

अलोक नाथ यांच्यावर अभिनेत्रीने केलेले अत्याचाराचे आरोप; स्वत:चा अनुभव सांगत नारायणी शास्त्री म्हणाली, 'त्यांनी कधी आमच्यासोबत...'

SCROLL FOR NEXT