ankush chaudhari, deepa chaudhari, ankush chaudhari love story SAKAL
मनोरंजन

Valentine Day Ankush Chaudhari: लोअर परेलच्या ब्रिजवर भर गर्दीत गुडघ्यावर बसून अंकुशने दीपाला प्रपोज केलं आणि....

अंकुशने खास फिल्मी स्टाईल मध्ये दीपाला प्रपोज केलं होतं

Devendra Jadhav

Ankush Chaudhari Love Story: आज व्हॅलेंटाईन डे.. प्रेमाचा दिवस.. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी प्रेमाची भावना मनसोक्त जगली आहे. मराठी इंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय अंकुश चौधरीची लव्हस्टोरी हटके आहे.

अंकुशने दीपा चौधरी सोबत लग्न केलं हे आपल्याला माहीतच आहे. पण अंकुशने खास फिल्मी स्टाईल मध्ये दीपाला प्रपोज केलं होतं. आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने जाणून घेऊया अंकुश - दीपाची लव्हस्टोरी

(ankush chaudhari ani deepa chaudhari love story)

अंकुश आणि दीपा दोघेही महर्षी दयानंद कॉलेजमध्ये एकत्र होते. या दोघांची मैत्री दिवसेंदिवस वाढत होती. अंकुश आणि दीपा दोघेही अशा टप्प्यावर होते जिथे मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे अशी या दोघांची भावना होती.

दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. दोघांमध्ये असलेलं मैत्रीचं बॉण्डिंग खूप छान लेव्हलला होतं. आता मुद्दा होता तो प्रपोज करण्याचा..

अंकुश आता अभिनेता म्हणून मराठी इंडस्ट्री गाजवत असला तरीही त्याकाळी अगदी सिनेमात शोभेल अशा हटके स्टाईलने अंकुशने दीपाला प्रपोज केलं होतं. एम. डी. कॉलेज लोअर परेलच्या पुलापासून खूप जवळ होतं.

दीपा ब्रिजवरून चालत होती. अंकुशने ठरवलं होतं कि आज काहीही होईल पण दीपाला मनातल्या भावना सांगायच्या. अंकुश तिच्या मागे पळत होता. आसपास खूप गर्दी होती पण घाबरतोय तो अंकुश कसला..

अंकुशने या भर गर्दीत तिला प्रपोज करायचे ठरवले. अंकुश कोणाचीही पर्वा न करता माझ्या गुडघ्यावर खाली बसला. पुढे त्याने दीपाला गुलाब दिला आणि तिला एकदम फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले.

दीपाने सुद्धा अंकुशच्या या प्रपोजला होकार दिला. मग पुढे २००७ ला दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला काहीच दिवसांपूर्वी १६ वर्ष पूर्ण झाली.

अंकुश आणि दीपा दोघेही मनोरंजन क्षेत्रात त्यांच्या प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहेत. दीपा सध्या झी मराठीवरील तू चाल पुढं मालिकेत अभिनय करत आहे. तर अंकुश लवकरच केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमात झळकणार आहे.

या सिनेमात अंकुश शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे. याशिवाय अमृता खानविलकर आणि उर्मिला कोठारे यांच्यासोबत अंकुश ऑटोग्राफ या मराठी सिनेमात झळकणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT