Shalva Kinjawadekar: व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधला.. शाल्व किंजवडेकरने गर्लफ्रेंड सोबत केला साखरपुडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shalva kinjawadekar, shalva kinjawadekar engagement

Shalva Kinjawadekar: व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधला.. शाल्व किंजवडेकरने गर्लफ्रेंड सोबत केला साखरपुडा

Shalva Kinjawadekar Engagement: सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन डे निमित्ताने प्रेमाचे वारे वाहत आहेत. याच व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत मराठमोळ्या अभिनेत्याने गर्लफ्रेंड सोबत साखरपुडा केलाय. हा अभिनेता म्हणजे शाल्व किंजवडेकर.

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील ओमकार या भूमिकेमुळे शाल्व घराघरात लोकप्रिय झाला. शाल्वने त्याची गर्लफ्रेंड श्रेया दफलापुरकर सोबत काल १२ फेब्रुवारीला साखरपुडा केलाय.

( Shalv Kinjawadekar engagement with his girlfriend)

शाल्वने मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितित साखरपुडा केलाय.शाल्वच्या साखरपुडयाला सिद्धार्थ चांदेकर - मिताली मयेकर, अभिषेक देशमुख - कृतिका देव, अभिनेत्री आदिती सारंगधर, शुभांगी गोखले असे अनेक कलाकार उपस्थित होते.

शाल्वने श्रेया सोबत डान्स केला. याशिवाय भलामोठा केक कापून शाल्व आणि श्रेयाने सेलिब्रेशन केलं.

काही दिवसांपुर्वी शाल्व आणि श्रेयाचे मेहंदीचे धम्माल फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाल्व आणि श्रेयाने खास पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. आणि दोघांनी मेहेंदी सोहळ्यात सुद्धा धम्माल डान्स केला.

नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत शाल्व आणि श्रेयाचा मेहेंदी सोहळा रंगला. साखरपुड्यानंतर शाल्व आणि श्रेया लवकरच लग्नबंधनात अडकणार असून दोघांच्या लग्नाची त्यांच्या फॅन्सना उत्सुकता आहे.

शाल्व व श्रेया हे गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. श्रेया ही एक स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनर आहे . तिने अनेक मराठी सेलिब्रिटींच्या लग्नात स्टायलिस्ट म्हणून काम केलंय.

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नात श्रेयाने स्टायलिस्ट म्हणून जबाबदारी सांभाळली होती. शाल्व आणि श्रेयाचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर दिसतात.

शाल्वने येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून ओंकारची भूमिका लोकप्रिय केली. याशिवाय बकेट लिस्ट, एक सांगायचंय, गोंद्या आला रे अशा सिनेमांमध्ये त्याने अभिनय केलाय. सेक्स, ड्रग्ज अँड थिएटर अशा वेबसिरीजमध्येही शाल्व झळकला आहे.

येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत शाल्व आणि अन्विता यांनी साकारलेले ओंकार - स्वीटू यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले.

टॅग्स :Marathi Movies