१६ वर्ष झाली तरीही Jab We Met ची जादू कायम.. फॅन्सनी केला थेटरमध्ये डान्स, शाहिद म्हणाला..

इम्तियाज अलीचा जब वी मेट (2007) सिनेमागृहात पुन्हा रिलीज झालाय
 jab we met, shahid kapoor, kareena kapoor
jab we met, shahid kapoor, kareena kapoorSAKAL

Jab We Met: व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बॉलिवूडमधले क्लासिक रोमँटिक सिनेमे पुन्हा रिलीज झालेत. याच सिनेमांमध्ये इम्तियाज अलीचा जब वी मेट (2007) सिनेमागृहात पुन्हा रिलीज झालाय. जब वी मेट पाहिला नसेल असा माणूस सापडणं दुर्मिळ आहे.

शाहिद आणि करीना कपूरचा हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या तितकाच जवळ आहे. जब वी मेट रिलीज होऊन १६ वर्ष झाली तरी आजही या सिनेमाची जादू कायम आहे याचा अनुभव नुकताच आला.

(Even after 16 years, the magic of Jab We Met remains.)

 jab we met, shahid kapoor, kareena kapoor
Bigg Boss 16: मोठी बातमी..! सलमान खानने बिग बॉस सोडला, पुढचा हंगाम होस्ट करणार नाही?

नुकत्याच झालेल्या जब वी मेट स्क्रिनिंगमध्ये एका फॅनने एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, "जवळपास 16 वर्षांनंतर #ValentinesWeek मधील Jab We Met, सोशल मीडियावर कोणत्याही जाहिरातीशिवाय हाऊसफुल चालू आहे, एक क्लासिक रोमँटिक कॉमेडी किती यशस्वी होऊ शकते याचा हा अनुभव आहे. शाहिद कपूर थिएटरमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया नक्की बघ तुला आवडतील" असं ट्विट फॅनने केलंय.

जब वी मेट संपल्यावर मौजा मौजा हे गाणे मोठ्या पडद्यावर आलं आणि सिनेमाचे चाहते थेट खुर्चीवर उभं राहून नाचले. हे ट्विट आणि हा व्हिडिओ शाहिद कपूरपर्यंत गेला. शाहिद कपूरने सिनेमागृहातील हा व्हिडिओ पाहून 'खूप खास' अशी प्रतिक्रिया दिली.

एकूणच १६ वर्ष झाली तरीही जब वी मेट सिनेमाची जादू अजून कमी झाली नाही. आणि फॅन्स सुद्धा आवर्जून हा सिनेमा पाहण्यासाठी थेटरमध्ये गर्दी करत आहेत.

 jab we met, shahid kapoor, kareena kapoor
Shalva Kinjawadekar: व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधला.. शाल्व किंजवडेकरने गर्लफ्रेंड सोबत केला साखरपुडा

26 ऑक्टोबर 2007 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या जब वी मेटमध्ये तरुण अरोरा, सौम्या टंडन, दारा सिंग आणि पवन मल्होत्रा ​​यांच्याही भूमिका होत्या. करिनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तर शाहिदला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले.

जब वी मेट सिनेमाचा नंतर तामिळ आणि तेलगूमध्ये रिमेक करण्यात आला. शाहिद कपूर - करीनाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

जब वी मेट मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, गुडगाव, फरिदाबाद, लखनौ, नोएडा, डेहराडून, दिल्ली, चंदीगड, कोलकाता, गुवाहाटी, बेंगळुरू, हैदराबाद, इंदूर, चेन्नई, वेल्लोर आणि त्रिवेंद्रम यासह भारतातील 37 शहरांमध्ये प्रदर्शित झालाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com