Aryan Khan Bribery Case Bombay HC Extends Interim Protection To Sameer Wankhede By 23 June
Aryan Khan Bribery Case Bombay HC Extends Interim Protection To Sameer Wankhede By 23 June sakal
मनोरंजन

Sameer Wankhede: आर्यन खान केस प्रकरणात समीर वानखेडे यांना न्यायलायचा दिलासा, पण..

नीलेश अडसूळ

Sameer Wankhede: आर्यन खान केस प्रकरणात तपास करणारे एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, आज त्यांची न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणी मध्ये न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. येत्या 23 जून पर्यन्त त्यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे.

यावेळी वानखेडे यांच्या वकिलाने संबंधित याचिकेवर अधिक संशोधन करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली आहे.

आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये सीबीआयने एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी लाच घेतली असल्याचेही सीबीआयनं म्हंटलं आहे. वानखेडे यांना तात्काळ अटक व्हावी अशी मागणी सीबीआय कडून करण्यात आली होती.

परंतु वानखेडे यांनीही न्यायालयात याचिका दाखल केली, या प्रकरणी आज झालेल्या सुनावली यामध्ये समीर वानखेडे यांना दोन आठवडे दिलासा दिला आहे.

समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने केलेले आरोप -

१) सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात समीर वानखेडे यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यात के. पी. गोसावी हा वानखेडे यांच्यासाठी शाहरूख खानच्या सचिवाशी डील करत होता.

२) वानखेडेंच्या सांगण्यावरून गोसावीने आर्यन प्रकरणात २५ कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते.

३) वानखेडे यांनी गोसावीला सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. गोसावीने १८ कोटींचा सौदा पक्का केला होता. एवढेच नाही, तर गोसावीने ५० लाख रुपये आगाऊ घेतल्याचा सीबीआयचा आरोप आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT