मनोरंजन

Bigg Boss 15: पाणी समजून तेलच प्यायली अफसाना...

युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजनाच्या (entertainment) क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असणारा रियॅलिटी शो म्हणून बिग बॉसचे नाव घेता येईल. या शो नं आतापर्यत मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बिग बॉसचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावरही या रियॅलिटीशोविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत असते. सध्याच्या 15 व्या बिग बॉसच्यी सीझननं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. एका एपिसोडचा प्रोमो व्हायरल झाला होता. त्यात सहभागी स्पर्धकांनी जे काही केलं त्याची जोरदार चर्चा आहे.

बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या अफसानचा तो व्हिडिओ आहे. त्यामध्ये तिनं पाणी समजून तेल प्यायली असं त्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. अनावधानं तिच्याकडून ती कृती घडली. मात्र ज्यावेळी त्याविषयी तिच्या सहकारी स्पर्धकांना कळलं तेव्हा त्यांना हसू आवरलं नाही. प्रतीक आणि शमिता यांनी हसून तिची चेष्टा केल्याचे दिसुन आले आहे. त्याचं झालं असं की, बिग बॉसनं घरातले आणि जंगलातले असे दोन वेगळे टास्क दिले होते. त्यासाठी दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये घरातले टीममध्ये होते प्रतीक आणि शमीता, निशांत. टास्क जिंकण्यासाठी दोन्ही टीमनं मेहनत घेतली. मात्र यावेळी निशांतला दुखापत झाली.

या टास्कमध्ये जे दोन लोकं सर्वात जास्त अॅक्टिव्ह होते त्यात एक होता करण कुंद्रा आणि दुसरा जय भानुशाली. जय आणि करणनं घरवाल्यांना रोखण्यासाठी पूर्ण मोर्चेबांधणी केली होती. त्यांचा गेम प्लॅनही वेगळा होता. दुसरीकडे जंगलवाले टीममध्ये सहभागी असणाऱ्या अफसाना, शमिता यांनीही चांगली टक्कर दिली. यावेळी पाणी पिण्यासाठी अफसाना घरात गेली असताना तिनं घाईत समोर ठेवलेली तेलाची बाटली उचलली आणि काहीही विचार न करता प्यायला सुरुवात केली. त्यानंतर तिला जाणवलं की आपण पाण्याऐवजी तेल पिलो आहोत. त्यानंतर तिनं करणला आपण पिलेल्या पाण्याची चव वेगळी का आहे असा प्रश्न विचारला. त्यावर करणनं तिला सांगितलं की, तु पाणी नव्हे तर तेल प्यायली आहेस. ही गोष्ट शमिता आणि अमितला कळाल्यानंतर ते जोरानं हसू लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल प्रकरणात CM केजरीवाल अन् त्यांच्या पत्नीची चौकशी होणार, महिला आयोग आक्रमक!

Darjeeling Tea: किंमती वाढल्या पण निर्यात घटली; दार्जिलिंग चहा संकटात का आहे?

JEE Advanced Admit Card 2024 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र आज मिळणार; असे करा डाऊनलोड

Pakistan Espionage Case : पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी फरार मुख्य आरोपीला अटक; NIA ची कर्नाटकात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! पुण्यात कोयत्याने सपासप करुन तरुणाचा टोळक्याकडून खून

SCROLL FOR NEXT