KRK Tweet Viral on social media  esakal
मनोरंजन

'कंगना करणला नडली, तिच बॉलीवूडची बॉस': KRK ने पुन्हा डिवचलं

बॉलीवूडमध्ये सतत आपल्या वादग्रस्त विधानांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणून केआरकेचे नाव घ्यावे लागेल.

सकाळ ऑनलाईन टीम

Bollywood News: बॉलीवूडमध्ये सतत आपल्या वादग्रस्त विधानांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणून केआरकेचे नाव घ्यावे लागेल. कुणाचीही भीती न बाळगता (Karan Johar) आपल्याला जे वाटेल ते बोलणारा कमाल राशिद खान (KRK) हा आता पुन्हा त्याच्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे. त्यामध्ये त्यानं बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरला लक्ष्य केले आहे. कंगनानं आतापर्यत करण जोहरला जे नाही त्या भाषेत टोकलं. (Kangana Ranaut) त्यावर करणनं आपली हार मानली आहे. यावरुन सिद्ध होतं की कंगनाच ही बॉलीवूडची बॉस असल्याचे दिसून आले आहे. केआरकेचं ट्विट हे सोशल मीडियावर मोठ्या (Social Media Viral) प्रमाणात व्हायरल झालं आहे. त्यावर त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

करण जोहरनं त्याचा कॉफी विथ करण (Coffee With Karan) नावाचा शो आता बंद करणार असल्याचे सांगितले होते. त्यावरुन त्याच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. करणच्या या शो नं गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. आता तो शो बंद होणार असल्याचे कळताच चाहत्यांना वाईट वाटले आहे. आपण गेल्या कित्येक वर्षांपासून या शो चे होस्टिंग करत होतो. मी आता त्यातून माघार घेत असल्याचे करणनं सांगितलं होतं. यासगळ्या प्रकरणावर केआरकेनं करण जोहरवर सडकून टीका केली आहे. कंगनाक़डून करणनं हार मानली आहे. अशा शब्दांत त्यानं आपला राग व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्टिटमध्ये कमाल खान म्हणतो, खरं तर आता कंगनासोबत मोठी पार्टी करायला हवी. जिनं कायम करणला लक्ष्य केले. त्याला जे नाही ते बोलली. त्याच्यावर टीका केली. गेल्या पाच वर्षांपासून कंगनानं त्याचा सामना केला आहे. आणि ती त्याला पुरुन उरली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, कंगना हीच बॉलीवूडची बॉस आहे. तिनं करणचा पराभव केला आहे. करणनं देखील त्याच्या माघारीवरुन ते मान्य केले आहे. अशा शब्दांत कमाल खाननं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT