salman khan news  esakal
मनोरंजन

IIFA 2022: सलमानला का आलं रडू? 'त्या' प्रसंगाविषयी सांगताना झाला भावूक

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या ट्रोल होताना दिसून येत आहे. आयफा पुरस्कार सोहळ्या दरम्यान सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला (Bollywood Actor Salman Khan) आहे.

युगंधर ताजणे

IIFA 2022: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या ट्रोल होताना दिसून येत आहे. आयफा पुरस्कार सोहळ्या दरम्यान सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला (Bollywood Actor Salman Khan) आहे. त्यात त्यानं सुनील शेट्टी बाबत आठवण सांगितली आहे. ती आठवण सांगताना त्याला रडू आल्याचे त्या व्हिडिओतून दिसत (Entertainment News) आहे. सलमानच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस दिल्या आहेत. अनेकांनी त्याला त्यावरुन ट्रोलही केले आहे. Salman khan news

त्या पुरस्कार सोहळ्याच्या वेळी अँकर रितेश देशमुख सलमानला विचारतो की, (bollywood movie news) तुमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय असा प्रसंग कोणता, त्यावर सलमान म्हणतो ते दिवस मला अजुनही आठवतात ज्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. अभिनेता सुनील शेट्टीचं एक दुकान होतं. त्या दुकानात एकदा गेलो होतो. त्या दुकानातील अनेक वस्तु या महागड्या होत्या. मला असं सांगण्यात आलं होतं की, मी त्या दुकानातून एक शर्ट आणि एक जीन्स घेऊ शकतो. मी एक जीन्स घेतली. पण त्याचे पैसे कसे द्यायचे हा माझ्यासमोर प्रश्न होता. माझ्याकडे पैसेच नव्हते.

सुनील शेट्टीनं ते पाहिलं. त्यानं मला त्याच्यावतीनं आणखी एक शर्ट भेट म्हणून दिलं. त्यावेळी त्यानं पाहिलं की, माझी नजर ही स्टोन पर्सवर होती. सुनील अण्णा मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानं मला ते वॉलेटही दिले. हा प्रसंग सांगताना सलमान कमालीचा भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी होते. यावेळी सुनील शेट्टीच्या मुलानं अहान शेट्टीनं यावेळी सलमानची गळा भेट घेतल्याचे दिसून आले.

सलमानचा तो व्हिडिओ विरल भयानीनं सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. अनेकांनी सलमानप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे तर काहींनी सलमानला ट्रोल देखील केले आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, याला ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये द्या. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, सलमानच्या अॅक्टिंगसाठी 111 रुपये द्या. नेहा कक्करकडून त्यानं ट्रेनिंग घेतलं आहे. अशा प्रकारच्या कमेंट सलमानच्या त्या व्हि़डिओवर व्हायरल झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT