esakal | सुनील शेट्टीची इमारत सील; कोरोना रुग्ण आढळल्याने महापालिकेचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

sunil shetty on small screen

सुनील शेट्टीची इमारत सील; कोरोना रुग्ण आढळल्याने महापालिकेचा निर्णय

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दक्षिण मुंबईतील अभिनेता सुनील शेट्टी Sunil Shetty राहत असलेली इमारत कोविड Covid 19 रुग्णांमुळे सील करण्यात आली आहेत. अल्टामाऊंट रोडवरील 'पृथ्वी अपार्टमेंट्स' नावाची इमारत मुंबई महापालिकेने सील केली आहे. या इमारतीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इमारत दोन दिवसांपूर्वी सील केल्याची माहिती दिली. सुनील शेट्टी आणि त्यांचं कुटुंब सध्या मुंबईबाहेर असल्याचं समजतंय. (Sunil Shetty's House In South Mumbai Sealed Due To Corona Cases)

'पृथ्वी अपार्टमेंट्स' ही ३० मजली इमारत असून त्यात १२० फ्लॅट्स आहेत. सुनील शेट्टी हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत गेल्या अनेक वर्षांपासून या इमारतीत राहत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या इमारतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: आमिर खाननंतर आणखी एका अभिनेत्याकडून घटस्फोटाचा निर्णय जाहीर

राज्यात 6,013 रुग्ण बरे झाले तर 8,535 रुग्णांची भर

राज्यात रविवारी दिवसभरात 8,535 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 61,57,799 झाली आहे.राज्यात आज रोजी एकूण 1,16,165 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. रविवारी राज्यात 6,013 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 59,12,479 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 % एवढे झाले आहे.

loading image