Salman Khan Threat Letter Case
Salman Khan Threat Letter Caseesakal

Salman khan Threat: मुंबई पोलिसांकडून 200 CCTV जप्त, 10 पथकांकडून वेगानं तपास

बॉलीवूडचा प्रसिद्ध सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारं ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. (salim Khan) त्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली. सलमानच्या

Salman khan Threat: बॉलीवूडचा प्रसिद्ध सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारं ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. (salim Khan) त्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली. सलमानच्या चाहत्यांना तर मोठा धक्काच बसला. गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाची अशाच प्रकारे पत्र व्हायरल करुन हत्या करण्यात आली होती. (Mumbai Police) त्यानंतर आता सलमानला जीवे मारण्याची धमकी आल्यानं चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात येत होती. सलमानच्या वडिलांना ते (Viral News) धमकीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. मुंबई पोलिसांनी वेगानं तपासाला सुरुवात केली असून सलमानच्या घराभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.(Salman Khan Threat Letter Case)

सध्या सलमान खान, सलीम खान यांची चौकशी सुरु आहे. सलमाननं आपल्या (Salman Khan) चौकशीत मला जी धमकी देण्यात आली त्या धमकी देणाऱ्यांविषयी सर्व सामान्य लोकांना जेवढी माहिती आहे तेवढीच मला आहे. असे सांगितले होते. (Bollywood Actors) ही धमकी मला का देण्यात आली आहे याचे कारण सांगता येणार असेही त्यानं यावेळी पोलिसांना सांगितले. याप्रकरणात दिल्लीतील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यात आली आहे. त्यानं केलेल्या मोठ्या (entertainment news) खुलाशामुळे पुन्हा एक नवीन गोष्ट समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. विरल भयानीनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सलमानचा एक फोटो शेयर केला आहे. तो फोटो हैद्राबादमधील आहे. त्या सलमान सर्वांना जेवण वाढताना दिसतो आहे. सलमान सध्या हैद्राबादमध्ये एका चित्रपटाच्या शुटिंगमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस सलमानच्या धमकी प्रकरणात सक्रिय झाली आहे. त्यांनी वेगानं तपासाला सुरुवातही केली आहे.

Salman Khan Threat Letter Case
Salman Khan: 'अरे कोण आहे लॉरेन्स बिश्नोई? मी नाही ओळखत!'

मुंबई पोलिसांनी आतापर्यत 200 सीसीटिव्ही जप्त केले असून या प्रकरणाच्या तपासासाठी 10 पथकं तयार करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांशिवाय क्राईम ब्रँचला देखील त्यात सहभागी करुन घेण्यात आले आहे. यापूर्वी पोलिसांनी अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सलमानच्या घरी कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या वडिलांना सिक्युरिटी स्टाफच्या बेंचवर ते पत्र आढळून आलं. त्या सुरक्षारक्षकानं ती चिठ्ठी सलमानच्या वडिलांना दिली होती.

Salman Khan Threat Letter Case
Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com