Kajal Agrawal  esakal
मनोरंजन

वा छान, काय नाव ठेवलंय मुलाचं!, काजल अग्रवालच्या मुलाचं नामकरण

सिंघम चित्रपटातून बॉलीवूडच्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी (Bollywood Actress) अभिनेत्री काजल अग्रवाल हिनं काल गोड बातमी दिली होती.

युगंधर ताजणे

Bollywood News: सिंघम चित्रपटातून बॉलीवूडच्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी (Bollywood Actress) अभिनेत्री काजल अग्रवाल हिनं काल गोड बातमी दिली होती. तिनं मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर पोस्ट करुन काजलनं तिच्या (Kajal Agrawal) साऱ्या चाहत्यांना ही गु़ड न्युज शेयर केली होती. त्यामुळे तिलाही नेटकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता तिच्या मुलाच्या नामकरणाची बातमी (viral news) समोर आली आहे. कालपासूनच तिला काही नेटकऱ्यांनी नावं पाठवण्यास सुरुवातही केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काजल आणि पती गौतम यांनी कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती दिलेली नव्हती.

काजलच्या बहिणीनं निशा अग्रवालनं पोस्ट शेयर करुन ही बातमी सांगितली होती. त्यानंतर गौतम किचलुनं इंस्टावर खास पोस्ट शेयर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यावेळी त्याला नेटकऱ्यांनी मुलाचे नाव काय ठेवले असा प्रश्न विचापरला होता. त्यावर गौतमनं अजून त्याचे नाव विचाराधीन असल्याचे सांगितले होते. आता काजलनं आपल्या मुलाचे नामकरण केल्याची बातमी व्हाय़रल झाली आहे. यापूर्वी प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगची गुड़ न्युज समोर आली होती. तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तिनं अकराव्या दिवशीच सेटवर जाणे हे नेटकऱ्यांना आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल केले होते.

आता गौतम आणि काजलनं आपल्या मुलाचे नाव जाहिर केले आहे. त्यांच्या मुलाचे नाव नील किचलु असे असून त्यांनी यावेळी आपल्या घरातील अनेकांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सोशल मीडियावर त्या फोटोंना कॅप्शन देताना गौतमनं लिहिलं आहे की, आमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या नील किचलुचं मनापासून स्वागत. आमच्या कुटूंबात त्यानं येऊन आम्हा सगळ्यांना खूप आनंद दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price : LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर; कुठे स्वस्त, कुठे सर्वाधिक महाग? सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना धक्का

Maharashtra Weather: ऑगस्टमध्ये पावसाची पाठ, आता सप्टेंबरचीही चिंता! मराठवाडा-विदर्भावर दुष्काळाचे सावट

Paneer Bhurji Toast Recipe: मुलं डबा पूर्ण संपवतील! कमी वेळात बनवा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट; रेसिपी आहे अगदी सोपी!

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर पुण्यात खलबतं! फडणवीसांच्या उपस्थितीत उपसमितीची बैठक; १२ सप्टेंबरपूर्वी तोडगा काढण्यासाठी सरकारची धावपळ

Rajgurunagar Crime : बहिणीशी न बोलल्याच्या रागातून पत्नीचा खून; मुलावरही चाकूने केला हल्ला, पती फरार

SCROLL FOR NEXT