मनोरंजन

कोहलीनं शमीची बाजू घेतल्यावर स्वरा म्हणाली, पहिल्यांदाच...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपची हवा आहे. त्याची मोठया प्रमाणात क्रेझ आहे. गेल्या रविवारी भारताला पाकिस्तान विरोधात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावरुन भारतावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी यावेळी विराटच्या बाजुनं प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र चाहत्यांनी विराट आणि त्याच्या टीमवर टीका केली. एवढेच नाही तर भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले होते. त्यावरुन भडकलेल्या चाहत्यांना विराटनं सुनावलं होतं. आपण जे काही बोलता आहात ते चूकीचे आहे. आपल्याच संघातील खेळांडूविषयी असं बोलणं चूकीचं आहे. असं त्यानं म्हटलं होतं.

वेगवेगळ्या मुद्दयांवर आपली प्रतिक्रिया देणाऱ्या स्वराची नेहमीच चर्चा होत असते. भारतानं पाकिस्तान विरोधातील सामना हरल्यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. यावेळी बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपआपल्या प्रतिक्रिया दिली होती. आताही स्वरानं विराटच्या बाजुनं आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, माझ्या मते विराटनं पहिल्यांदाच चांगलं काही सांगितलं आहे. विराटच्या व्टिटवर तिनं टाळ्या वाजवतानाचा इमोजी शेयर केला आहे. त्यावेळी काही नेटकऱ्यांनी स्वरालाही ट्रोल केले आहे. स्वरा मावशी तर आज क्रिकेटची सपोर्टर झाली आहे. असं त्यांनी लिहिलं आहे.

यापूर्वी प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं व्टिट करुन कोहलीचे अभिनंदन केले होते. त्यानं लिहिलं होतं की, तु एकदम बरोबर केलं आहे. विराटच्या चाहत्यांनी देखील त्याला सपोर्ट केला आहे. मैदानात जे काही झालं त्यावर विराटनं आपल्या खेळांडूंची बाजु घेतली आहे. ही स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल. असे म्हटले आहे. विराटनं जे व्टिट केलं होतं त्या व्टिटला स्वरानं रिव्टिट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT