मनोरंजन

अहानचा शर्टलेस डॅशिंग लूक, ताराची ब्युटी; 'तडप' Trailer Viral

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये सध्या वेगवेगळ्या चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट पुढील महिन्यांत प्रदर्शित होणार आहे. फॉक्स स्टार स्टूडियोजची प्रस्तुती आणि सह-निर्मिती असलेला, साजिद नाडियाडवाला यांचा 'तड़प' निश्चितच या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. जेव्हापासून चित्रपटाच्या निर्मात्यांनी या अनोख्या प्रेमगाथेच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. तेव्हापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि उत्साह दिसून येतो आहे. याच उत्सुकतेला थोडे अधिक ताणत निर्मात्यांनी आज या रोमँटिक एक्शन ड्रामाच्या ट्रेलरला व्हायरल केले आहे.

जो रॉ, इंटेंस, पैशनेट आणि अपलिफ्टिंग संगीतमय आहे. मिलन लुथरिया यांच्याद्वारे दिग्दर्शित, अहान शेट्टी आणि तारा सुतारिया अभिनीत 'तड़प'च्या या ट्रेलरमध्ये या दोन युवा स्टार्समध्ये एक सुंदर एलेक्टरीफाइंग केमिस्ट्री पहायला मिळत आहे. या प्रभावी ट्रेलरमध्ये, आपल्याला अनुक्रमे अहान आणि तारा यांनी रंगवलेल्या इशान आणि रमिसा यांच्या जगाची झलक मिळणार आहे. सुंदर रामिसा हिमाच्छादित पर्वतांच्या नयनरम्य ठिकाणी दिसते आहे तर इशाना तिच्या बाइकसह वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अहानचा शर्टलेस डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे, आणि ताराच्या लूकला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

विशेष म्हणजे अहान आणि तारा या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडियावर टीझर पोस्ट केला असून चाहत्यांसाठी हा सुखद धक्का आहे. अहान शेट्टीच्या मोठ्या बॉलीवूड पदार्पणासोबतच, हा तेलगू ब्लॉकबस्टर RX 100 चा अधिकृत हिंदी रिमेक असून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा रोमँटिक ड्रामा आहे. फॉक्स स्टार स्टूडियोजद्वारे प्रस्तुत आणि सह-निर्मित, नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या 'तडप'ची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली असून मिलन लुथरिया यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपट 3 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT