Darlings Actor Santosh Juvekar Podcast, share his struggle days and darlings shooting experience, And Marathi industry etc. Instagram
मनोरंजन

'मला मराठीत कामच देत नाहीत'; कारण सांगत स्पष्टच बोलला संतोष जुवेकर...

आलिया भट्टच्या 'डार्लिंग्ज' सिनेमात जनार्दन जाधव ही व्यक्तिरेखा साकारणारा संतोष जुवेकर सध्या भलताच चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Santosh Juvekar Podcast: आलिया भट्ट आणि शेफाली शहाच्या 'डार्लिंग्ज'(Darlings) सिनेमाची सध्या चर्चा आहे. या सिनेमात सध्या एक मराठमोळा अभिनेता देखील त्याच्या अभिनयानं वाहवा मिळवताना दिसतोय,तो आहे संतोष जुवेकर. आतापर्यंत अनेक मराठी मालिका,सिनेमातून प्रेक्षकांचा फेव्हरेट बनलेला संतोष जुवेकर आता हिंदी सिनेमा-वेबसिरीजच्या दुनियेत नाव कमावताना दिसत आहे. यानिमित्तानं सतोष जुवेकरनं Sakal Unplugged कार्यक्रमात दिलखुलास संवाद साधला आहे. याच मुलाखतीत मात्र त्यानं मराठी सिनेमात आपल्याला घेत नाहीत अशी खंत बोलून दाखवली आहे. याच्या कारणाचाही त्यानं खुलासा याच मुलाखतीत केला आहे. जो ऐकण्यासाठी बातमीत जोडलेली ही मुलाखत नक्की ऐका. (Darlings Actor Santosh Juvekar Podcast, share his struggle days and darlings shooting experience, And Marathi industry etc.)

संतोष जुवेकरनं या मुलाखतीत एक आठवण सुंदर शेअर केली आहे. तो म्हणाला, ''आज ज्या शाहरुखच्या रेड चिलीची निर्मिती असलेल्या 'डार्लिंग्ज' सिनेमात मी काम केलं आहे,ज्यासाठी मला मानानं फोन करत,मोठ्या थाटात स्वागत करत,अदबीनं वागवलं त्याच रेड चिली ऑफिसच्या गेट वरनं २२-२३ वर्षांपूर्वी मला हाकलून दिलं होतं''. आपला तो सबंध किस्सा संतोषनं या मुलाखतीत अगदी सविस्तर ऐकवला आहे. तो धम्माल किस्सा आहे. तो ऐकायचा असेल तर आपल्याला संतोष जुवेकरची बातमीत जोडलेली ही मुलाखत नक्की ऐकावी लागेल.

संतोष जुवकेरनं याच पॉडकास्ट मुलाखतीत शेअर केलेले त्याच्या स्ट्रगलिंग काळातले किस्से देखील मनाला स्पर्शुन जातात. एकाच वन रुम किचनमध्ये दहा जणं एकत्र राहण्यापासून ते खिशात पैसे नसल्यानं ग्लुकोजची बिस्किटं पाण्यात बुडवून खाणं ते अगदी रहायला घर नाही म्हणून स्मशानात झोपणं इथपर्यंत अनेक संघर्षाच्या दिवसांवर संतोष मुलाखतीत मन मोकळं करत बोलला आहे. पण याच मुलाखतीत त्यानं यशाच्या पायऱ्या चढतानाचा प्रेरणादायी अनुभवही शेअर केला आहे. 'वास्तु तथास्तु म्हणते, म्हणून...' .संतोष जुवेकरनं यावरही छान किस्सा शेअर केला आहे. तेव्हा संतोष जुवेकरचे धमाल किस्से, प्रेरणादायी अनुभव आणि मराठी इंडस्ट्रीविषयीचे खुलासे ऐकायला वर बातमीत जोडलेली पॉडकास्ट मुलाखत नक्की ऐका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT