'चलो निकलो इधरसे, उधर खडे रहो', शाहरुखच्या ऑफिसात संतोष जुवेकरचा अपमान Santosh Juvekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Juvekar emotional Post About Shahrukh Khan

'चलो निकलो इधरसे, उधर खडे रहो', शाहरुखच्या ऑफिसात संतोष जुवेकरचा अपमान

Santosh Juvekar 'Darlings': अभिनेता संतोष जुवेकर(Santosh Juvekar) हे नाव आता केवळ मराठीपुरतं राहिलेलं नाही तर हिंदीतही गाजतंय असं म्हटंल तर चुकीचं नक्कीच ठरणार नाही. संतोष जुवेकरनं हिंदी वेबसिरीज करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. पण आता चक्क त्यानं नंबर लावलाय आलिया भट्टच्या पंक्तीत बसण्याचा. सध्या त्याच्या नव्या सिनेमामुळे तो चर्चेत आहे. आलिया भट्ट,विजय वर्मा, शेफाली शहा, रोशन मॅथ्यूज यांच्या भूमिका असणाऱ्या 'डार्लिंग्ज'(Darlings) सिनेमात मराठमोळा संतोष जुवेकरही एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थातच त्यामुळे संतोष सध्या फॉर्मात आहे.{(Santosh Juvekar emotional Post About Shahrukh Khan)

हेही वाचा: Urmila Matondkar चा जान्हवी कपूरच्या जन्मासंबंधी मोठा खुलासा, म्हणाली...

आलियाचा डार्लिंग्ज सिनेमा नेटफ्लिक्सवर ५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. सिनेमाची निर्मिती रेड चिलीज एन्टरटेन्मेंटची असून, स्वतः आलिया भट्ट देखील या सिनेमाची सहनिर्माती आहे. आता शाहरुखच्या सिनेमात काम करत असल्याने संतोषसाठी सिनेमा खास असणार हे वेगळं सांगायला नको. त्यानं सिनेमाचा ट्रेलर शेअर करत एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये संतोषने अनेक वर्षांपूर्वी शाहरुखच्या रेडचिली कंपनीच्या सिक्युरिटी तर्फे जी अपमानास्पद वागणूक त्याला मिळालेली अन् साधं कंपनीच्या गेटच्या आत पायही ठेवायला मिळाला नव्हता या संदर्भात लांबलचक अनुभव कथन करणारी पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा: अभिनेत्री कुब्रा सैतचं खळबळजनक विधान; म्हणाली,'शाळेतल्या शिक्षकांनीच...'

संतोष त्या पोस्टमध्ये म्हणाला आहे,र्ष -१९९८.

ठिकाण - दीप भवन, Dreams unlimited production (शाहरुख खान आणि जुही चावला production office)

मी office च्या बाहेर उभा राहून आत जाता येईल का कुणाला भेटता येईल का म्हणुन gate वर जाऊन विचारतो एका security gard ला तर तो मला ओरडून " चलो निकलो इधरसे चलो उधर खडे रहो, किसीने बुलाया होगा तोही अनेका. चलो निकलो........ आणि मी थोडासा नाराज होऊन पण थोडासा चिडून त्याला बोलतो " रुक तू.......

एकदिन तुमलोगही gate खोलेगा मेरेलिये " असं बोलून त्या bulding जवळ थोड्यावेळ उभं राहून मी निघून जातो.

पण मनात आणि डोक्यात एक स्वप्नं आणि तो अपमान कायम उराशी बाळगलेला.

मग काही वर्षांनतर मला एक call येतो " hi santosh sir m calling from redchillis entertainment can we meet? We want to cast u for our next film,

if possible plz come to the office."

हेही वाचा: 'सगळी कामं फाट्ट्यावर मारून चावट चॅनेलवर जा..' असं का म्हणतोय संतोष जुवेकर?

संतोषनं यानंतर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यानं लिहिलं आहे,

वर्ष -२०२०

ठिकाण - खार - सांताक्रूझ.

Redchillis entertainment pvt ltd (शाहरुख खान production office)

मी gate वर पोहोचतो माझ्या गाडीतून, गाडी gate च्या बाहेर parking साठी जागा शोधतोय तेव्हढ्यात call येतो " hi sir where r u? We r waiting for u." मी त्यांना सांगतो की मी आलोय खाली आहे parking साठी जागा शोधतोय तर तो मला म्हणतो अरे sir plz park inside wait m sending someone to assist u.

आणि काही मिनटात office च gate उघडल जात security धावत माझ्या गाडीजवळ येतो आणि मला सांगतो "sir plz आईये." बास्स्स्सस्स्स्सस्स्स्सस्स्स्स.......

ते शब्द कानावर पडतात आणि मला १९९८ चा संतोष दिसतो बाजूलाच उभा असतो तो कडक थाप मरतो पाठीवर तो माझ्या आणि म्हणतो " भाई य्ये मेरा शेर..... ज्जा जिले अपनी जिंदगी."

शारुख काकांच्या सिनेमांतलं त्यांच्या तोंडी असलेलं वाक्य.

"कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है."

आणि आपल्या मराठीत म्हण आहेच की देवाची करणी आणि नारळात पाणी

बस बाप्पा कडे एवढीच मागणी तू खूप देतोयस पण ते सांभाळण्याची बुद्धी आणि शक्ती सुद्धा दे महाराजा

बाकी मला अजून मोठ्ठ करायला तुम्ही सगळे आहातच आवडलं तर शाब्बास म्हाना आणि नाही आवडलं तर कान पिळा पन हानू नका

Web Title: Santosh Juvekar Emotional Post About Shahrukh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..