'dharmveer' movie poster on asia's biggest hoarding in bandra  sakal
मनोरंजन

आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर झळकले ‘धर्मवीर’

मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके मोठे होर्डिंग लावण्यात आले आहे.

नीलेश अडसूळ

जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न (Marathi Movie) सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात 13 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता प्रसाद ओक (prasad oak) आनंद दिघे यांची भूमिका साकारत असून त्यांचा पहिला लुकसमोर आल्यापासून चित्रपटाबाबतअधिकच उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटाने नवा विक्रम केला आहे.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लागलेले चित्रपटाचे ३० फुटी कट आऊट्स सर्वांचे लक्ष तर वेधून घेत आहेतच पण आता चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या या तंत्रात नवी भर पडली आहे. अशी गोष्ट जी आजवर मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धी किंवा जाहिरात तंत्रात कधीच घडली नव्हती. मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे १६८०० स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतू आता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं भव्य दिव्य पोस्टर झळकले आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर बघायला मिळत असून या भागातून जाणा-या लाखो वाहनधारकांचे तथा परिसरातील रहिवाश्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा बघायला मिळत आहे. आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या लोककारणी आनंद दिघे यांचा चरित्रपट असलेल्या या चित्रपटाचे हे होर्डिंग बघताना आभाळासम भासे धर्मवीर हा असाच भाव सर्वांच्या मनात उमटत आहे.

झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला आणि प्रविण तरडे (pravin tarde) यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

घटस्फोट पाहिले, नाती तुटताना पाहिली... लग्नाआधीच ऋषी सक्सेनासोबत लिव्ह-इनमध्ये का राहते ईशा केसकर? स्वतः सांगितलं कारण

MPSC Exam Update: एमपीएससी ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना; अधिकृत निर्णयाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

SCROLL FOR NEXT