
सलामान खान आणि आनंद दिघे यांच्यात समान आहेत या तीन गोष्टी..
जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न (Marathi Movie) सोडवण्यासाठी खर्ची घालणारे 'लोककारणी' म्हणजे आनंद दिघे. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या रुपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे (anand dighe) यांची भूमिका साकारत असून त्यांचा पहिला लुकसमोर आल्यापासून चित्रपटबाबतअधिकच उत्सुकता वाढली आहे. शनिवारी या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला.
प्रवीण विठ्ठल तरडे (pravin tarde) यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओजने केली आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील गुरुपौर्णिमेचे गाणे आणि आणि टीजर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता उत्कंठा आहे ती 13 मे ची. अवघ्या काही दिवसातच हा चित्रपट रिलीज होणार आहे. शनिवार वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेल मध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा आयोजित करण्यात आला होता. अत्यंत दिमाखदार पद्धतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रसाद ओक (prasad oak) याने आनंद दिघे यांच्या गाडीतून एंट्री घेतली. प्रसादला आनंद दिघे यांच्या रूपात पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत उपस्थित होते. बॉलीवुड अभिनेता सलमान खान हा या सोहळ्याचे पप्रमुख आकर्षण ठरला. या सोहळ्याला सलमानने केवळ हजेरी लावली नाही तर त्याने मराठीतून संवाद साधला. यावेळी त्याने दिघे साहेब आणि स्वतः मधील दोन समान गोष्टी सांगितल्या.
सलमान म्हणाला, ‘नमस्कार, माझं नाव सलमान खान आहे, मला या चित्रपटाचा ट्रेलर फार आवडला. आताच मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलत होतो. त्यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली. आनंद दिघे फक्त एका बेडरुमध्ये राहत होते. मी ही तसाच एकाच बेडरुममध्ये राहतो. नंतर आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी सांगितलं की आनंद दिघे यांचं लग्न झालं नव्हतं. माझं पण लग्न झालेलं नाही. आमच्यात या समान गोष्टी आहे. पुढे तो म्हणाला, ‘धर्मवीर चित्रपट खूप चालेलं. पहिल्या धर्मवीर चित्रपटाला ज्या प्रमाणे यश मिळालं तसं याही चित्रपटाला मिळेल.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सलमानच्या वक्तव्यावर अजून एक टिपणी केली. ‘सलमानभाई तुम्ही दोन साम्य सांगितली पण तुमच्यात तीन साम्य आहेत. तुम्ही दोघेही दबंग आहात. एक चित्रपटातील तर एक खऱ्या जीवनातील..’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.