photo credit- fb, madhuri dixit 
मनोरंजन

या चिमुकल्याला ओळखलंत का? माधुरी दीक्षितशी आहे खास कनेक्शन

स्वाती वेमूल

सोशल मीडियामुळे सेलिब्रिटी व चाहते यांच्यातील दरी कमी झाली आहे. सेलिब्रिटी अत्यंत सहजपणे चाहत्यांशी संवाद साधू शकतात आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत. आपल्या सौंदर्याने, नृत्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या माधुरीवर अनेकजण फिदा आहेत. पण माधुरीचं प्रेम डॉक्टर श्रीराम नेनेंवर जडलं आहे. पतीच्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर त्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. 

माधुरीने पोस्ट केलेल्या फोटोंपैकी एक हा श्रीराम यांच्या बालपणीचा आहे. 'सर्वांत गोड बर्थडे बॉय' असं कॅप्शन देत माधुरीने त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीराम नेनेंचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडतोय. 'तुझ्यासोबत आयुष्य खूप मजेशीर आणि रंजक घटनांनी परिपूर्ण आहे', असं तिने आणखी एका फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. 

माधुरी आणि श्रीराम नेने यांची लव्हस्टोरी अत्यंत रंजक आहे. माधुरी लॉस एंजिलिस येथे भावाला भेटायला गेली असता तिथे तिची श्रीराम नेनेंशी पहिल्यांदा भेट झाली. विशेष म्हणजे त्यावेळी श्रीराम यांना माधुरी ही बॉलिवूड अभिनेत्री आहे हे माहितच नव्हतं. यानंतर दोघांनी एकमेकांच्या पसंतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT