varsha gaikwad and dr.amol kolhe
varsha gaikwad and dr.amol kolhe  
मनोरंजन

डॉ.अमोल कोल्हेंची 'भूमिका': शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

Dr.Amol Kolhe: मराठीतील प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Ncp Leader Amol Kolhe) यांनी आपण नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका करणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली गेली. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या. नेटकऱ्यांनी डॉ.कोल्हे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी कोल्हे यांना सोशल मीडियावरुन काही प्रश्नही विचारले होते. याशिवाय काही शहरांमध्ये त्यांच्याविरोधात आंदोलनं झाल्याचे दिसून आले. Education Minister varsha Gaikwad reaction on dr amol kolhe nathuram chracter

आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी अमोल कोल्हे यांच्या आगामी गांधी यांच्यावरील चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हुतात्मा दिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलो आहोत. स्वच्छता, अहिंसा मानणाऱ्या गांधीजींचे विचार गोळीने कुणीही संपवू शकत नाही , हे जगाने मान्य केलं आहे. गांधींवरील चित्रपट येतो आहे. पण आपण गांधीजींनी सांगितलेल्या विचारांकडे सकारात्मकतेनं पाहण्याची गरज आहे.

दुसरीकडे पंतप्रधान सातत्याने महात्मा गांधींच उल्लेख करत असतात. त्यामुळे गांधींजीच्या विचारांचे पालन आपण सगळ्यांनी करायला हवे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या भूमिकेविषयी सांगायचे झाल्यास, कोल्हे यांनी आत्मक्लेशाचा निर्णय घेतला त्याचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हे यांच्या नथुरामाच्या भूमिकेवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहे. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. कलाकारानं कोणती भूमिका करायची हा त्याच्या अभिव्यक्तीचा प्रश्न आहे. अमुक एखाद्याची भूमिका केल्यानं तो कलाकार त्याच विचारांचा आहे असं म्हणणं चूकीचं असल्याचं पवार यांनी म्हटलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheena Bora Murder Case : हाडे सापडलीच नव्हती... इंद्राणीचा सांगाडा अन् राहुल मुखर्जीबाबत मोठा दावा, जाणून घ्या काय म्हणाली?

T20 World Cup चालू असतानाच शुभमन गिल अन् आवेश खान का परतले भारतात? अखेर टीम इंडियाच्या कोचनेच केला खुलासा

आम्ही लग्नाळू! मॅट्रिमोनी साईटवरही नाही मिळाली मुलगी, युवक थेट न्यायालयात; वेबसाईटला दिले भरपाई देण्याचे आदेश

पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावेत! पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठवला प्रस्ताव

MHT CET 2024 Results Declared: एमएचटी सीईटी निकाल जाहीर, 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल! असा पाहा निकाल

SCROLL FOR NEXT