Boney Kapoor
Boney Kapoor Valimai movie
मनोरंजन

'वलीमाई' मध्ये चाहत्यांनी बोनी कपूरच्या गाडीला दही-दुधाने घातली आंघोळ

सकाळ डिजिटल टीम

एच. विनोथ दिग्दर्शित अजितचा बहुप्रतिक्षित अॅक्शन ड्रामा 'वलीमाई' रिलीज झाला आहे. चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) चेन्नईतील एका थिएटरमध्ये 'वालीमाई' (Valimai) साठी चाहत्यांमध्ये सामील झाले आणि उत्स्फूर्त प्रतिसादासह चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. मात्र, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या कारवर काही चाहत्यांनी हल्ला केला होता. त्यांच्या कारला काही चाहत्यांनी दही आणि दुधाने आंघोळ घातल्याचे दिसून आले. पण, बोनी कपूर मात्र शांत राहिले आणि त्या घोळक्यातून बाहेर पडले. (Fans bathe Boney Kapoor's car with curd and milk at 'Valimai')

सर्व चाहते उत्सुक आहेत आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या फर्स्ट शोचा आनंद घेत आहेत. असे म्हटले तरीही, निर्मात्याच्या गाडीवर झालेला हल्ला हा धक्कादायक होता.

दरम्यान, 'वालीमाई'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अजितने त्याच्या या अॅक्शन अवताराने चाहत्यांना आकर्षित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT