Farah Khan reaction on raj kundra biopic  esakal
मनोरंजन

Farah Khan : 'राजवर जर चित्रपट केला तर शिल्पा....' फराह खान काय बोलून गेली?

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते.

युगंधर ताजणे

Farah Khan made biopic on shilpa shetty husband :

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. तिचा पती राज कुंद्रा हा गेल्या काही वर्षांपासून एका वेगळ्याच कारणासाठी वादाचा विषय ठरला आहे. त्यात प्रख्यात अभिनेत्री फराह खाननं त्याच्यावर बायोपिक करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

राज कुंद्रावर अश्लील व्हिडिओ तयार करुन ते बाहेरच्या देशात प्रसारित करणे असा आरोप होता. त्याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. सध्या ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टीला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. शिल्पानं देखील राजच्या बाबत लोकांना न बोलण्याचे आवाहनही केले होते.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

दरम्यानच्या काळात शिल्पा अन् राजमध्ये कौंटूंबिक संघर्ष उभा राहत असल्याची चर्चा होती. मात्र त्याला शिल्पानं नकार दिला. त्या सगळ्या अफवा असल्याचे तिनं स्पष्ट केले होते. आता बॉलीवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खाननं राजवर बायोपिक करणार असल्याचे संकेत दिले आहे. तिनं एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याबाबतची माहिती दिल्याचे वृत्त हिंदूस्थाननं दिले आहे.

बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी राजवर वेगवेगळे आरोपही केले होते. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. त्याला दोन महिने तुरुंगातही जावे लागले होते. हायप्रोफाईल केस म्हणून राज कुंद्राकडे पाहिले गेले. आता असे म्हटले जाते की, फराह खान यासगळ्या घटनेवर आधारित चित्रपट तयार करणार आहे. सोशल मीडियावर फराहचा तो व्हिडिओ तो व्हायरल होत आहे. त्यात फराहनं दिलेल्या उत्तराची चर्चा होत आहे.

त्या व्हिडिओमध्ये फराह म्हणते की, अरे मुनव्वर मला एका चित्रपटाची आय़डिया सांग, त्यावर तो म्हणतो, मॅडम तुम्ही एखादा बायोपिक का नाही बनवत? तर फराह म्हणते, हो तर...आजकाल बायोपिक खूप चालतात. त्यावर पुन्हा मुनव्वर फारुकी फराहला म्हणतो, राजवर चित्रपट करुया का, फराह म्हणते, त्याचे नाव जरा आदरानं घे. राज कपूर तुझे काही मित्र आहेत का, हे ऐकून मुनव्वरला प्रश्न पडतो. तो म्हणतो तुम्ही नेमक्या कोणत्या राजविषयी बोलता आहात...

फराह पुन्हा त्याला म्हणते की, जो नेहमीच मास्क लावतो तो राज...त्यावेळी फराहला असे वाटते मुनव्वरला कदाचित मनोज कुमार वाटले असावेत. म्हणून ती त्याला राज कुंद्रा असे सांगते. त्यावर फराह म्हणते, त्याच्यावर जर चित्रपट काढला तर शिल्पा तरी पाहेन का? असा प्रश्न फराह यावेळी करते.

फराहच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास २०१४ मध्ये तिचा हॅप्पी न्यु इयर नावाचा चित्रपट आला होता. त्यानंतर अजून तिचा कोणताही नवा प्रोजेक्ट समोर आलेला नाही. ती बऱ्याच दिवसांपासून कोरिओग्राफीमध्ये बिझी असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT