The Vaccine War Twitter Review : आपण आपल्या 'रियल हिरों'चे कौतुक कधी करणार अग्निहोत्रींनी दिला मोठा दणका!

सिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सीन वॉर हा चित्रपट आपल्या त्यासगळ्या कलाकृतींपेक्षा काही वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढं मात्र नक्की...
The Vaccine War Twitter Review
The Vaccine War Twitter Review esakal

The Vaccine War Twitter Review : कोरोना काळाशी संबंधित अनेक कलाकृती गेल्या काही दिवसांत आपल्यासमोर आल्या.त्यातून निर्मात्यांनी त्या कटू दिवसांच्या आठवणी, भयाण प्रसंग आणि व्यवस्थेशी दोन हात करणारा सामान्य माणूस याविषयी प्रभावी मांडणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सीन वॉर हा चित्रपट आपल्या त्यासगळ्या कलाकृतींपेक्षा काही वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढं मात्र नक्की... (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

यापूर्वी अग्निहोत्री यांच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटानं प्रेक्षकांचे, नेटकऱ्यांचे आणि देशभरातील अनेक विचारवंत, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावरुन मोठा वादही झाला होता. समाजात घडणाऱ्या गोष्टींना तितक्याच बेधडक अन् परखडपणे मोठ्या पडद्यावर मांडण्याचा अग्निहोत्री यांचा स्वभाव हा त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. हिंदू पंडितांना काश्मिरच्या खोऱ्यात ज्या संघर्षाला सामोरं जावं लागलं त्याचे प्रभावी चित्रण त्यांनी त्यांच्या काश्मीर फाईल्समधून केले होते.

Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?

अग्निहोत्री यांचा द व्हॅक्सीन वॉर हा पुन्हा वेगळ्या धाटणीचा विषय प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यातून त्यांनी कोरोनाच्या वेळची परिस्थिती, वैद्यकीय क्षेत्र त्यातील राजकारण, यावर दिग्दर्शकानं आपल्या खास शैलीतून भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते सडेतोडपणे व्यक्त झाले आहेत. यापूर्वी मधुर भांडारकर, अनुभव सिन्हा सारख्या दिग्दर्शकांनी देखील आपल्या कलाकृतींतून कोविडच्या परिस्थितीवर मार्मिकपणे भाष्य केले आहे.

द व्हॅक्सीन वॉर ही काही डॉक्युमेंट्री नाही तर एक फिचर फिल्म आहे. अनेकांना तो माहितीपट आहे असे वाटण्याची शक्यता अधिक आहे. अग्निहोत्री यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञांचा प्रवास अन् त्यांचा संघर्ष आपल्यासमोर मांडला आहे. प्रेक्षकांनी देखील त्याचे स्वागत केले आहे. त्यांच्या या कलाकृतीचे कौतुक केले आहे.

चित्रपटाची कथा आहे तरी काय?

द व्हॅक्सीन वॉरची कथा ही २०२० पासून सुरु होते ती २०२२ पर्यतच्या काही प्रसंगावर आधारलेली आहे. चीनमधील वुहान या प्रांतातून आलेल्या त्या व्हायरसमुळे संपूर्ण देश चक्रावून जातो. आयसीएमआर ही भारतातील वैद्यकीय संस्था काळजीत पडते. या जीवघेण्या आजारातून बाहेर पडायचे तरी कसे, तिथून चित्रपट पुढे सरकतो. शास्त्रज्ञांची एक टीम कोरोनावरील त्या व्हायरसचे संशोधन करण्यात व्यस्त होते.

The Vaccine War Twitter Review
Telgi Review : लोभी वृत्तीची मनोरंजक, सुरस कथा !

शास्त्रज्ञांच्या त्या सगळ्या प्रवासात त्यांना कोणत्या गोष्टींना संकटांना सामोरं जावं लागते हे अग्निहोत्री यांनी मोठ्या खुबीनं प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते बऱ्याचअंशी यशस्वीही झाले आहेत. त्यावेळचे सरकार त्यांनी घेतलेला पुढाकार, जनतेला केलेले आवाहन आणि त्यावरुन झालेला वाद हे देखील प्रभावीपणे आपल्यासमोर दिग्दर्शक मांडतो. सध्या सोशल मीडियावर त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टही व्हायरल झाल्या आहेत.

The Vaccine War Twitter Review
Jawan Movie Review : 'सरकार निवडून देताना हजार वेळा विचार करा!' 'जवान'मध्ये शाहरुखनं केली 'उंगली'

अग्निहोत्री या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन अशा दोन्ही गोष्टी सांभाळल्या आहेत. द व्हॅक्सीन वॉर या चित्रपटाप्रती अग्निहोत्री यांचा दृष्टिकोन हा काहीसा वेगळा असल्याचे दिसून येते. नेटकऱ्यांनी देखील त्याप्रकारच्या भाष्य करणाऱ्या प्रतिक्रिया आपल्या पोस्टमधून दिल्या आहेत. अग्निहोत्री या चित्रपटातून महिला सक्षमीकरणाचा मुद्दा देखील मांडला आहे. त्याकडे त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

द व्हॅक्सीन वॉरचा विषय हा मुळातच बऱ्याचअंशी शास्त्रीय असल्यानं त्यातील अनेक गोष्टी मांडताना दिग्दर्शकांचा गोंधळ झाल्याचे दिसते. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात चित्रपट रेंगाळताना वाटतो. कलाकारांच्या अभिनयाविषयी बोलायचे झाल्यास प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर यांनी डॉ.भार्गव यांची साकारलेली भूमिका ही प्रभावी आहे. नानांचा अभिनय ही चित्रपटाची ताकद आहे अशाही प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येताना दिसत आहेत.

नानांबरोबरच पल्लवी जोशी, निवेदिता भट्टाचार्य आणि गिरीजा ओक यांचेही काम प्रभावी झाले आहे. त्यांनीही आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाचा विषय आणि त्यातील इमोशन ही या कलाकारांनी अचूक हेरत आपली भूमिका चोखपणे बजावल्याचे दिसून येते.

द व्हॅक्सीन वॉर का पाहायचा...

कोरोना काळात ज्या व्यक्तींनी आपल्या जीवाची पर्वा न करता एकनिष्ठेने आपले कर्तव्य बजावले त्यांना समजून घेण्यासाठी तसेच ज्या वैद्यकीय तज्ञांनी मोठ्या संघर्षानं कोरोना सारख्या आजारावर संशोधन केले त्यांच्याप्रती असलेल्या आदरापोटी हा चित्रपट एकदा होईना पाहावा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होताना दिसत आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन संपूर्ण मानवजात एका वेगळ्या परिस्थितीतून जात असताना त्याला पूर्ण तयारीनिशी सामोरं जाण्याची ताकद हा चित्रपट आपल्यासमोर मांडतो. त्याशिवाय व्यवस्था कशाप्रकारे काम करते, एखादे काम पूर्णत्वाला जावे यासाठी कोणत्या विविध मार्गांनी सहकार्य करते हेही त्यात खूबीनं मांडण्यात आले आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या या कलाकृतीचे आता नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

----------------------------------------------------------------------

द व्हॅक्सीन वॉर

दिग्दर्शक - विवेक अग्निहोत्री

कलाकार - नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक, निवेदिता भट्टाचार्य

रेटिंग - 3 / 5

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com