Fighter Box Office Collection
Fighter Box Office Collection 
मनोरंजन

Fighter Box Office Collection: हृतिकच्या 'फायटर'चा बॉक्स ऑफिसवर जलवा; 10व्या दिवशी केली एवढी कमाई

सकाळ डिजिटल टीम

Fighter Box Office Collection Day 10: अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या 'फायटर' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सिद्धार्थ आनंदनं (Siddharth Anand) दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील अॅक्शन सीन्सचं अनेक जण कौतुक करत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता रिलीजच्या 10 व्या दिवशी 'फायटर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं कलेक्शन...

'फायटर'चे कलेक्शन (Fighter Box Office Collection)

हृतिक रोशनच्या 'फायटर'या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 22.05 कोटी रुपयांची कमाई केली. आता या चित्रपटाला रिलीज होऊन दहा दिवस झाले आहेत. अशताच या चित्रपटानं रिलीजच्या 10 व्या दिवशी 10.05 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई जवळपास 162.75 कोटी झाली आहे.दीपिका आणि हृतिकचा 'फायटर'हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील होणार आहे.

'फायटर'ची स्टार कास्ट

दीपिका आणि हृतिक यांच्यासोबतच, फायटर या चित्रपटात अनिल कपूर, करण सिंह ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, ऋषभ साहनी आणि संजीदा शेख या कलाकारांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात हृतिक स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया या भूमिकेत दिसत आहे, तर दीपिकाने स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड ही भूमिका साकारली आहे. 250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा मल्टीस्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन यांनी फायटर या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली. 2008 मध्ये रिलीज झालेल्या बचना ए हसीनो आणि 2023 मधील ब्लॉकबस्टर पठाण चित्रपटानंतर दीपिकानं सिद्धार्थ आनंदच्या फायटर या चित्रपटात काम केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT