actress amisha patel and sunny deol
actress amisha patel and sunny deol  Team esakal
मनोरंजन

वीस वर्षांपूर्वी तारासिंगच्या डायलॉगनं केला होता 'गदर'

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) आजच्या दिवशी वीस वर्षांपूर्वी दोन वेगळ्या विषयांवरचे चित्रपट झाले होते. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (boxoffice) इतिहास घडवला होता. त्यांची लोकप्रियता साता समुद्रापार गेली होती. लगान (Lagaan) आणि गदर एक प्रेमकथा (Gadar ek premkatha) अशी त्या दोन्ही चित्रपटांची नावे होती. त्यापैकी एक ऑस्करच्या (Oscar) शर्यतीत होती. तर एकानं सर्वसामान्य भारतीय प्रेक्षकांच्या हृद्याला हात घातला होता. त्या चित्रपटातील संवाद अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. भारत - पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणावाचे संबंध सर्वांना माहिती आहे. गदर एक प्रेमकथेनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. (gadar 20 years sunny deol become superhit anil sharma directed movie blockbuster)

अनिल शर्मा (Anil sharma) यांनी गदर एक प्रेमकथा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यात ते यशस्वीही झाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव, आणि पाकिस्तानमधील मुलीबरोबर भारतीय मुलाचं प्रेम, त्याच्या प्रेमाला देण्यात आलेला धार्मिक, राजकीय, सामाजिक रंग शर्मा यांनी प्रभावीपणे पडद्यावर मांडला होता. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. गदर एक प्रेमकथा मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे त्यातील संवाद. या चित्रपटातील संवादानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. सनी देओल आणि अमिशा पटेलची मुख्य भूमिका गदरमध्ये पाहायला मिळाली.

गदर पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक होते. जेव्हा हा सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षक पाहत असत त्यावेळी त्यांच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह दिसून येत असे. गदरची स्क्रिप्ट पहिल्यांदा अनिल शर्मा यांनी सनी देओल यांना ऐकवली होती. शर्मा यांची पहिली पसंती सनी देओल नव्हती. फार कमी लोकांना ही गोष्ट माहिती आहे की, त्या रोलसाठी पहिल्यांदा गोविंदाला विचारणा झाली होती. मात्र गोविंदाला असे वाटत होते की, तारा सिंगच्या रोलसाठी आपण फिट नाही. आणि पुढे तो रोल सनीनं केला होता.

सनी देओलचा (Sunny Deol) अभिनय आणि त्याच्या संवादासाठी गदर चित्रपट प्रचंड गाजला. त्यात पाकिस्तानमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी भांडून आपल्या प्रियसीला भारतात घेऊन येणारा तारा सिंग सर्वांना भावला होता. त्याच्या तोंडचे संवाद हे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनातले होते की काय अशी शंका त्या संवादाच्या लोकप्रियतेवरुन दिसुन येते. सनीनं आपल्या भूमिकाला पुरेपूर न्याय दिला होता. आणि त्यानं प्रेक्षकांची पसंतीही मिळवली होती.

गदर एक प्रेमकथा 15 जून 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी लगान आणि गदरमध्ये जोरदार टक्कर झाली.. त्यात तेव्हा अनेकांना असे जाणवले होते की, दोन्ही मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यानं त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागेल. मात्र तसे झाले नाही. 19 कोटी मध्ये तयार झालेल्या गदरनं 133 कोटी रुपयांचा बिझनेस केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT