Gandhi Godse Ek Yudh Row  esakal
मनोरंजन

Gandhi Godse Ek Yudh Movie : 'तुम्ही नथुरामाला हिरो बनवता', आता काय बोलायचं! गांधींचे पणतू भडकले

काश्मीर पंडितांवर होणाऱ्या अत्याचारावर आलेल्या काश्मीर फाईल्सनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता गांधी गोडसे एक युद्ध चित्रपटाची चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gandhi Godse Ek Yudh Movie: बॉलीवूडच्या गेल्या काही वर्षांपासून जे वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट येत आहेत त्यावरुन वाद होताना दिसत आहे. काश्मीर पंडितांवर होणाऱ्या अत्याचारावर आलेल्या काश्मीर फाईल्सनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता गांधी गोडसे एक युद्ध चित्रपटाची चर्चा आहे.

प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर याच्या गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटाची सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा आणि नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांची गोळ्या घालून हत्या करणारा नथुराम गोडसे यावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसते.

Also Read - दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

यासगळ्यात सोशल मीडियावर राजकुमार संतोषी यांच्या त्या नव्या चित्रपटानं पुन्हा एकदा अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वी देखील या विषयांवरील चित्रपट आणि नाटकांनी मोठी खळबळ उडवून दिली होती. मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाची नेहमीच चर्चा होत असते. येत्या २६ जानेवारीला राजकुमार संतोषी यांचा गांधी गोडसे एक युद्ध नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी संतोषी यांच्या या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला तर अजिबात नवल वाटलं नाही जेव्ही मी या चित्रपटाबद्दल ऐकलं. याचे कारण म्हणजे, तुम्ही ज्या व्यक्तीनं गांधींची हत्या केली तुम्ही त्या व्यक्तीला हिरो बनवता आहात. यावर आणखी काय बोलायचे, असा प्रश्न तुषार गांधी यांनी विचारला आहे.

राजकुमार संतोषी यांनी वेगळ्या अँगलमधून या चित्रपटाची निर्मिती केल्याचे बोलले जात आहे. नथुरामानं हल्ला केल्यानंतर जर गांधीजी वाचले असते तर देशाचे राजकारण, समाजकारण कसे असते याचा विचार या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे. यावर तुषार गांधी यांनी तुम्ही विनाकारण नथुराम गोडसेचे उदात्तीकरण का करता आहात असा प्रश्न यावेळी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT