
Gandhi Godse EK Yudh : '... पण माझ्या मुलाला कारटं का म्हणता?' चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा संताप अनावर!
Chinmay Mandlekar New Movie Wife Post : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर हा त्याच्या हटके अभिनयासाठी ओळखला जाणारा कलाकार आहे. तो नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. यासगळ्यात त्याला अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.
काश्मिर फाईल्समध्ये चिन्मयनं साकारलेल्या भूमिकेचे कौतूक झाले होते. यापूर्वी त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची साकारलेली व्यक्तिरेखा चाहत्यांच्या कौतूकाचा विषय होती. मात्र आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते त्याच्या गांधी-गोडसे एक युद्ध चित्रपटातील व्यक्तिरेखेमुळे, त्यामुळे त्याच्यावर काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Also Read - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
यासगळ्यात चिन्मयच्या पत्नीनं नेहा यांनी इंस्टावर शेयर केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामध्ये त्यांनी दरवेळी चिन्मयचा कोणताही नवा चित्रपट यायचा झाल्यास त्यावरुन त्याच्या मुलाला ट्रोल करण्याविषयी म्हटलं आहे. काही नेटकरी त्याचा उल्लेख कारटं असा करतात. अशी तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांचा संताप झाला आहे.
त्या पोस्टमध्ये नेहा म्हणतात, डियर ट्रोलर्स यासगळ्याचा मला आता कंटाळा आला आहे. तुम्ही दरवेळी त्या ९ वर्षाच्या मुलाला का ट्रोल करता, त्याच्या वडिलांचा कोणताही नवा चित्रपट येऊ घातला की तुम्ही त्याला चिडवता, चिन्मयनं त्याचं नाव हे जहांगीर रतनची दादाभॉय टाटा यांच्या नावावरुन ठेवले आहे.ते काही देशद्रोही नव्हते. हे समजून घ्यावे.
संस्कार, संस्कृती, नेमके काय असतात ? अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख ‘ कार्टं’ म्हणून करणारे संस्कार असतात ! त्याच्या आई बद्दल वाट्टेल ते असभ्य बोलणं म्हणजे संस्कृती जपणं का? आम्ही माणुसकी..प्रेम जपणारी माणसं आहोत. अशा शब्दांत नेहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आणि नेटकऱ्यांना, ट्रोल करणाऱ्यांना तारतम्य बाळगण्याचे, प्रतिक्रिया देताना विचार करण्याचे आवाहन केले आहे.