मनोरंजन

नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे निधन

संतोष भिंगार्डे

मुंबई ः मदर्स डे, वन रूम कीचन, दुधावरची साय, चाॅईस इज युवर्स, यू टर्न, हिमालयाची सावली अशा काही नाटकांची निर्मिती करणारे नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांचे आज सकाळी ब्रेन हॅमरेजने बोरिवली येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी तसेच एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

गोविंद चव्हाण हे बोरिवली येथे राहात होते. काल दुपारी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मात्र आज सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि आज सकाळी त्यांचे निधन झाले, अशी माहिती हिमालयाची सावली या नाटकाचा दिग्दर्शक राजेश देशपांडेने दिली. अत्यंत मननिळावू आणि सतत हसरा चेहरा असणारे गोविंद चव्हाण यांनी अनेकांना मदतही केलीआहे. यू टर्न हे आनंद म्हसवेकर लिखित व दिग्दर्शित त्यांचे नाटक कमालीचे गाजले. सध्या रंगभूमीवर त्यांची निर्मिती असलेले हिमालयाची सावली हे नाटक चांगले गाजत होते. अभिनेता शरद पोंक्षे यांनी यामध्ये मुख्य भूमिका केली आहे. 

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: ज्ञानेश कुमार यांच्या विरोधादरम्यान ECचा मोठा निर्णय; SIRमध्ये वगळलेल्या मतदारांना पुन्हा संधी, कशी आहे प्रक्रिया?

PF Claim Reject: PFचा पैसा काढताना करू नका या 10 चुका! नाहीतर रिजेक्ट होईल तुमचा क्लेम

Latest Marathi News Live Update : "आता मला वेदना नाही, तर अभिमान वाटतो" ,कॅप्टन स्मित यांची पंतप्रधान मोदींशी बातचीत

रणवीर सिंहनंतर आणखी एका अभिनेत्याने केलं न्यूड फोटोशूट; अंगावर एकही कपडा नाही; फोटोची जोरदार चर्चा

Heart Health: झिरो शुगर ड्रिंक्स हृदयासाठी सुरक्षित आहेत का? जाणून घ्या कार्डिओलॉजिस्टचा महत्वाचा सल्ला!

SCROLL FOR NEXT