I won't let my 4 wives watch 'Dunki', shah rukh khan gave an amazing answer to a fan's question SAKAL
मनोरंजन

Shah Rukh Khan: "माझ्या ४ बायकांना मी 'डंकी' बघू देणार नाही", फॅनच्या प्रश्नाला किंग खानने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला...

शाहरुख खानने डंकी निमित्त #askSRK सेशन केलं. तेव्हा हा खास किस्सा घडलाय

Devendra Jadhav

Shah Rukh Khan: शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी डंकी सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहरुखने आजवर अनेक सिनेमांमधून लोकांच्या मनावर राज्य केलं. शाहरुखचा आगामी डंकी सिनेमा काहीच दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुखने नुकतंच त्याच्या फॅन्ससोबत #askSRK हे सेशन केलंय. त्यावेळी एका चाहत्याने शाहरुखला भन्नाट प्रश्न विचारला. त्यावेळी शाहरुखने त्या चाहत्याला दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे.

(shah rukh khan gave an amazing answer to a fan's question)

चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं उत्तर

शाहरुख खानने नुकतंच x वर फॅन्ससोबत प्रश्न - उत्तरांचं #askSRK सेशन केलं. एका फॅनने शाहरुखला सांगितलं, माझ्या ४ बायका, २४ मुलं आणि ५० शेजाऱ्यांना मी डंकी पाहण्याची परवानगी देणार नाही. एवढं नुकसान मी सहन करु शकत नाही.

यावर शाहरुखने रिप्लाय केला की, भाई तू आधीच आयुष्यात इतका व्यस्त आहेस तर दुसरी कामं करायला तुला वेळ अजिबात मिळणार नाही. कृपया तुझ्या बायको - मुलांसोबत वेळ काढ. मुलांसोबत खेळ आणि बायकोसोबत सिनेमा पाहायला जा.

शाहरुखने दिलेला हा रिप्लाय चांगलाच व्हायरल झालाय.

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या हिट सिनेमांमुळे चर्चेत आहे. त्याने या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला . 'जवान' आणि 'पठाण' अशा हजार कोटींचे कलेक्शन करणाऱ्या चित्रपटानंतर आता सर्वांच्या नजरा शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटाकडे लागल्या आहेत. शाहरुख सध्या डंकी निमित्ताने ट्विटरवर #askSRK निमित्ताने चाहत्यांच्या संपर्कात असतो.

'डंकी' हा चित्रपट शाहरुखचा या वर्षातील तिसरा मोठा आणि बहुप्रतिक्षित असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू आणि विकी कौशल सारखे लोकप्रिय कलाकारही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणार आहे.

शाहरुखचा डंकी ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 22 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monalisa Marriage Case: नशीब तुम्ही केरळमध्ये आहात! व्हायरल कुंभ गर्ल मोनालिसा आणि तिच्या मुस्लिम पतीला हायकोर्टाने सुनावलं

वैभव सूर्यवंशीला विराट कोहलीने IPL जिंकल्यानंतर नक्की काय सांगितलं! RCB च्या Video ने उघडलं रहस्य

Mumbai: रात्री २ च्या सुमारास नग्न अवस्थेत महिला कार्यकर्त्याला फोन केला, नंतर भलतीच मागणी; भाजपच्या नेत्याचं विकृत कृत्य

"तू कुणालाच सेटवर नकोयस" सुकन्या यांनी आभाळमायाच्या सेटवर संजय जाधवांना दिलेला दम; "पहिला एपिसोड पाहिल्यावर.."

Latest Marathi News Live Update : अकोल्यात कृषी विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT