Dunki Budget:'डंकी'असणार स्वस्तात मस्त! हजार करोड कमावणाऱ्या शाहरुखच्या सिनेमाचं बजेट फक्त इतकंच!

शाहरुख खानचे चाहते त्याचा आगामी मोस्ट अवेटेड चित्रपट 'डंकी'ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Dunki Budget
Dunki BudgetEsakal

Shah Rukh Khan On Dunki: बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या हिट सिनेमांमुळे चर्चेत आहे. त्याने या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला . 'जवान' आणि 'पठाण' अशा हजार कोटींचे कलेक्शन करणाऱ्या चित्रपटानंतर आता सर्वांच्या नजरा शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटाकडे लागल्या आहेत.

Dunki Budget
IFFI 2023 : 'बॉलीवूडमध्ये सनीच्या टॅलेंटची कदर झालीच नाही'! प्रसिद्ध दिग्दर्शकानं केलं मोठ वक्तव्य

'डंकी' हा चित्रपट शाहरुखचा या वर्षातील तिसरा मोठा आणि बहुप्रतिक्षित असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू आणि विकी कौशल सारखे लोकप्रिय कलाकारही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणार आहे.

बुधवारी या चित्रपटाचे पहिले गाणे ड्रॉप 2 रिलिज करण्यात आले. शाहरुखचा हा चित्रपट पुढील महिन्यात ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 22 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Dunki Budget
Musafira Movie: मैत्रीची सुंदर सफर घडवणारा मुसाफिरा, या भोजपुरी अभिनेत्रीचं मराठीत पदार्पण

आता सर्व कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. तर शाहरुख देखील त्याचा जूना प्रमोशन फंडा वापरताना दिसत आहे. तो म्हणजे थेट चाहत्यांची संवाद. त्यासाठी शाहरुख चाहत्यांसोबत ASK SRK सेशन घेतो आणि त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तर देखील देतो.

डंकी पुर्वी शाहरुखचे जवान आणि पठाण हे बिग बजेट सिनेमे रिलिज झाले. त्यामुळे चाहत्यांना वाटत होते की डंकी देखील 200- 250 कोटींच्या बजेटमधील सिनेमा असेल मात्र शाहरुखचा 'डंकी' फक्त 85 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

मात्र यात मुख्य कलाकारांच्या फीचा समावेश नसल्याची चर्चा आहे. शाहरुख स्वतः या सिनेमाचा निर्माता असल्याने त्याचं मानधन गृहीत धरलं नाही तरीही डंकीचं बजेट फक्त १२० कोटी असेल.

महत्वाचे म्हणजे डंकी या चित्रपटाचे शुटिंग देखील 75 दिवसांत पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या बजेटच्या बाबतीत बोलायच झालं तर गेल्या सहा वर्षातील शाहरुखच्या कोणत्याही चित्रपटाचे बजेट इतके कमी नव्हते.

त्याचा आत्तापर्यंतचा सर्वात कमी बजेट सिनेमा हा 'रब ने बना दी जोडी' होता जो केवळ 31 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला आहे.

Dunki Budget
Animal: बापरे! रणबीरच्या सिनेमाची लांबी इतकी मोठी, सेन्सॉरकडून A सर्टिफिकेट

ASK SRK सत्रादरम्यान, शाहरुखने सांगितले की त्याने चित्रपटाचे नाव 'डंकी' का ठेवले? तर या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने सांगितले की, 'दोन्ही देशांच्या सीमेवरून प्रवास करण्याच्या अवैध मार्गाला 'डंकी' म्हणतात. हे काहीतरी फंकी, हंकी आणि माकड असे वाटतं.'

तर चित्रपटाची कथा देखील तशीच आहे. शाहरुख त्याच्या सर्व मित्रांचे लंडनला जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना या चित्रपटात मदत करतो.

तर आता 85 ते 120 कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींची कमाई करू शकेल का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com