kachcha limboo esakal live prasad oak chinmay mandalekar
kachcha limboo esakal live prasad oak chinmay mandalekar 
मनोरंजन

..अन उलगडली 'कच्चा लिंबू' बनण्यामागची धडपड; 'ई सकाळ लाइव्ह'ला रसिकांचा उदंड प्रतिसाद

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.

पुणे : खरेतर प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर यांची नव्याने ओळख करुन द्यायची गरज नाही. या दोघांनी अनेक कलाकृतीमध्ये एकत्र काम केले आहे. नांदी, अवघाची संसार, बेचकी ही त्यातली काही नावे. आता ही जोडगोळी नव्याने आपल्यासमोर येते आहे ती कच्चा लिंबू हा सिनेमा घेऊन. जयवंत दळवी लिखत ऋणानुबंध या कादंबरीवर हा सिनेमा बेतला आहे. याची पटकथा आणि संवाद चिन्मयने लिहिले असून दिग्दर्शन प्रसाद करतो आहे. या निमित्त या लेखक दिग्दर्शक जोडी ई सकाळच्या व्यासपिठावर लाइव्ह आली होती. त्यावेळी उलगडली या चित्रपटामागची धडपड. 

जवळपाास 2013 पासून या चित्रपटावर हे दोघे काम करत असल्याचे चिन्मयने सांगितले. मूळ कथा, त्यावरून आलेले नातीगोती हे नाटक आणि आता त्याचा सिनेमा हा प्रवास चिन्मयने उलगडून सांगितला. पण त्याचवेळी लेखकाला दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक असा प्रसादचा गौरवही केला. प्रसादनेही हा चित्रपट बनण्यामागची कल्पना, त्यासाठी झालेली पात्र निवड याबद्दल विस्तृत माहिती या लाइव्हमध्ये सांगितली. या चित्रपटात मनमित पेम, रवी जाधव यांची नेमकी एंट्री कशी झाली तेही हा शो नीट ऐकला तर कळेल. 

या गप्पांमधून ई सकाळने सुरू केलेल्या लाईव्ह रिव्ह्यूचे कौतुक दोघांनी केले. हे नवे पाऊल असून जी मंडळी प्रामाणिकपणे सिनेमा बनवतात ती मंडळी नक्की या संकल्पनेला पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याबद्दल सकाळचे कौतुकही केले. 

वाचकांनीही यावेळी आपल्या मनातले प्रश्न या दोघांनी विचारले. चिन्मय यांचा हलाल कधी येणार यापासून कच्चा लिंबू हा चित्रपट ब्लॅक अॅड व्हाईटमध्ये का बनवला असे अनेक प्रश्न यावेळी आले. त्यांनी तितक्याच मोकळ्यापणाने या दोघांनी उत्तरे दिली. गुरू पौर्णिमेच्या दिनी त्यांनी आपल्या गुरूंबद्दलही सांगितेल. हा शो तब्बल 55 मिनिटे चालला. हजारो रसिकांनी याचा आस्वाद घेतला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT