मनोरंजन

Taimur Ali Khan: तैमूरनं केला पराक्रम! करिना-सैफच्या लाडक्याने अवघ्या 6 व्या वर्षी जिंकल गोल्ड मेडल...

तैमूर विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण घेत आहे.

Vaishali Patil

Taimur Ali Khan wins gold medal: बॉलिवूडचे सुपर कपल करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्याचबरोबर दोघेही त्यांच्या फॅमिलीमुळेही चर्चेत असतात.

मात्र करीना आणि सैफ अली खान सोबतच त्यांचा लाडका लेक तैमूर अली खान देखील अनेकदा त्याच्या क्यूटनेसमुळे चर्चेत असतो.

इतक्या कमी वयातही तैमूरच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. त्याचे बरेच व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. अनेक वेळा तो पापाराझींवर भडकतो तर बऱ्याचदा त्यांच्यासोबत मस्ती करतानाही दिसतो.

तैमूर विविध प्रकारच्या खेळांचे प्रशिक्षण घेत आहे. करीनाने तिच्या एका मुलाखतीत तैमूर तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत असल्याचे सांगितले होते.

मात्र, सध्या तैमूर तायक्वांदोमध्ये सुवर्णपदक जिंकल्यामुळे चर्चेत आला आहे. तैमूरने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी तायक्वांदोमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. सध्या तैमूरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे त्याने सर्वांनाच चकित केले आहे. तैमूरने तायक्वांदो स्पर्धा जिंकली आहे.

तैमूरसह अनेक सेलिब्रिटींच्या मुलांनी मुंबईत आयोजित तायक्वांदो वार्षिक स्पर्धेत भाग घेतला होता. यात करिनासोबत राणी मुखर्जी देखील येथे उपस्थित होती. तर करण जोहर त्याचा मुलगा यश जोहरला चिअर करताना दिसला. यशनेही तायक्वांदो स्पर्धा जिंकली आहे.

तैमूर तायक्वांदो खेळून पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी त्याला तायक्वांदोमध्ये यलो बेल्ट मिळाला होता. करीनाने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केला होती. तायक्वांदो व्यतिरिक्त तैमूर खान इतर अनेक खेळांमध्ये पारंगत आहे. तो अनेकदा क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ दिसतो. करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान 20 डिसेंबरला 7 वर्षांचा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan Resignation Letter : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; सोशल मीडियावर फिरणाऱ्या पत्रामागील सत्य काय?

भाजप नेत्यांना फिरू देणार नाही! जरांगेंचा दिल्लीतून इशारा; जंतरमंतरवर आंदोलकांची घेतली भेट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, तर धर्मेंद्र प्रधान ओम बिर्लांच्या भेटीला

Delhi Protest '...त्यांच्या हातात दगड नव्हे तर पुस्तके', लाठीमारात जखमी नागपूरच्या तरुणाच्या कुटुंबीयांचा संताप

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

SCROLL FOR NEXT