Sam Bahadur Vicky Kaushal Movie Sachin Tendulkar
Sam Bahadur Vicky Kaushal Movie Sachin Tendulkaresakal

Sachin Tendulkar On Sam Bahadur : 'तुम्ही प्रत्येकानं सॅम बहादुर पाहायलाच हवा, कारण...'! क्रिकेटचा देव भारावला

प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार यांचा सॅम बहादुर नावाचा चित्रपट आता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Published on

Sam Bahadur Vicky Kaushal Movie Sachin Tendulkar : प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार यांचा सॅम बहादुर नावाचा चित्रपट आता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. भारतीय सैन्य दलातील फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटामध्ये विकी कौशलनं सॅम यांची भूमिका साकारली आहे.

खरं तर साऊथचा प्रख्यात दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा अॅनिमल आणि सॅम बहादुर हे एकाचवेळी प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये क्लॅश होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या अॅनिमलला याचवेळी अॅडव्हान्स बूकींगमध्ये मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

Healthy Homes का वाढते आहे आरोग्यपूर्ण घरांची मागणी?

या सगळ्यात सॅम बहादूरवर देशातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं सॅम बहादुर पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसत आहे. सचिननं म्हटलं आहे की, मी हा चित्रपट पाहिला आणि खूप भारावून गेलो. विकीनं ज्याप्रकारे माणेकशा यांची भूमिका साकारली आहे ती प्रभावी आहे.

विकीची देहबोली, त्याचा अभिनय सुंदर आहे. आपल्या देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी नव्या पिढीनं हा चित्रपट पाहणे अतिशय महत्वाचे आहे. अशा शब्दांत सचिननं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील विकीच्या सॅम बहादुरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Sam Bahadur Vicky Kaushal Movie Sachin Tendulkar
Salaar Twitter Review: 'कोणता नशा केलास भावा?' सालार काही केल्या पटेना! नेटकऱ्यांनी घेतली प्रभासची शाळा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com